Friday, May 9, 2014

TURNING INTO PROBLEMS...(FICTION)


She met me when All was well and left me when All was not well. This is how I understood the difference between All is well and All is not well. That taught me how to handle the situations and strengthened my aspirations and ambitions...It was not the end of life. It was the beginning of life without her. It seemed to be difficult in the beginning and became more challenging...the university campus reminded me all the moments that I spent with her...the Old and the Open Canteen...the Department of English...the hotels on the Ferguson road, Sarasbag and many other places that we had visited together troubled me in such a way that I could never visit those places again.

This was the time when everything, that I did, turned into failure…it frustrated me in the beginning but became habitual later on and I started to console myself whenever I got failure. In fact the phase of failure made me enough strong to face the situation and changed me drastically. I saw people raising fingers at my talent…I saw people criticizing me…I saw people commenting my actions and I saw people talking about whatever I was doing. I did nothing except listening to that and observing the things. All those things made me restless…It made me more frustrated...it made to think of myself..it made me to doubt my potential…and more than that it lessened my confidence which I had for a long time in life and from that time it never returned.

It all started when I was dreaming of a bright career ahead. Whatever I dreamt, it never happened. It did hurt me a lot. Nobody could understand the situation I had been going through. A moment came when I stopped dreaming and instead started focusing on the things that I have and neglecting the things that I do not have. I knew that time is the biggest heal. I just wanted to pass the time and to wait for the right time. Destiny…very difficult to understand…It gives you everything when you do not want and it takes everything away from you when you actually need it. ..People again may argue that destiny is our hands…but it is not…For a long time I used to think that I have been controlling my life…actually it was not…It was being controlled…I do not know “WHO” was doing it. There is no specific answer for this. 
Now I think that certain things are important in life. It teaches a lot. It makes us conscious. It makes us understand that:

FAILURE IS NOT THE STEPPING STONE TO SUCCESS. SUCCESS IS ALWAYS THE SUCCESS and FAILURE IS ALWAYS THE FAILURE.

There is no point even if we get success later on. And it may not be the right time. We lose the important things in the process. This is an important lesson that I learnt from failure.

I never understand how the life changes so suddenly and how it takes a different turn only to put you in problems. It may not be a problem but an opportunity for some people.

I do not know how she came in my life when I did not want anybody. She not only came in life but became an important part of my life and at the crucial moment, when I had become habitual of her, she left me with no reasons and I did not ask explanation.


I understood that SUCCESS AND FAILURE cannot be together. They are opposite. And do not try to bring it together.

Sachin Bhagat

असंच काहीतरी......२


एक छोटं आयुष्य अन त्यातले अनेक चढ-उतार. नको वाटतं हे सगळं आता. वाढतं वय आणि वाढत्या जबाबदार्या...कंटाळा आलाय या समीकरणाचा. जगण्याचा आनंद घेण्य ऐवजी त्यातच गुरफटलोय. पावलागणिक नवीन अडचणी उभ्या ठाकतात. एक गुंता सोडवावा तर दुसरा तयार. याच्या बाहेर पडण्याची इच्छा असून सुद्धा काही करू शकत नाही. शिकत असताना वाटायचं कि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही तरी कमवायला लागल्यानंतर व्यवस्थित होईल सगळं. पण तसं काहीच होत नाही. या उलट असंख्य नवीन प्रश्न निर्माण होतात. आणि ते सोडवता सोडवता नाकी नऊ येतात. किती दिवसांपासून घर बांधायचं अस ठरवलं. पैसे येतात आणि जातात. पण नियोजन काही जमेना. प्रत्येकाचं एक स्वप्नं असतं आपलं एक घर असावं. पण कदाचित ते स्वप्नं च राहील कित्येक दिवस. सध्या तरी ते दृष्टीक्षेपात नाही. आर्थिकदृष्ट्या सध्यातरी ते शक्य नाही. कर्ज घ्यावं म्हटलं तर बँक वाले उभे पण करत नाहीत. 

सगळ्या बँका फिरून झाल्यात. शेवटी तो प्रयत्न हि असफल. ग्रामीण भागात लोक सावकाराकडून कर्ज का घेतात त्या प्रश्नाचं उत्तर या निमित्ताने मिळालं. आपले प्रश्न आपलेच असतात. त्याचं उत्तर आपल्याकडेच असते पण तरी आपण ते दुसरीकडे शोधात असतो. कुठली आशा असते कुणास ठाऊक. जर आयुष्य असंच असेल तर ते नको आहे मला. माझ्या आयुष्याच्या कल्पना खूप वेगळ्या होत्या. पण त्यांचा आणि वास्तव स्थितीचा कुठलाही संबंध नाही. दोन्ही गोष्टी दोन टोकाला. आणि मी कुठेतरी भटकतोय या दोन टोकांमध्ये. टोलवा टोलव आहे सगळं. आयुष्याने अनुभवापलीकडे काही दिलं नाही. प्रत्येकजण स्वतःच्या जीवनात मग्न झालाय. बाहेर काय सुरु आहे कुणालाच माहित नाही.

एका वेळी वेगवेगळ्या पातळ्यांवर लढण म्हणजे तारेवरची कसरत. पैसा कमावणे फार सोपे आहे पण त्याचं नियोजन आणि बचत प्रचंड कठीण आहे. वेगळ काहीतरी करायचं होतं मला. पण त्या विचारात मीच वेगळा होऊन गेलो. आता भूतकाळात ला मी अन आताचा मी.....कुठलाही संबंध नाही. स्वतःची च दोन प्रतिमा समोर येतात. आणि मी नेमका कुठला याचं उत्तर मला सापडत नाही.


अस्तित्ववाद म्हणजे काय ते पुस्तकं वाचून फक्त व्याख्याच कळल्या. पण आता तो कळायला लागलाय. निझे, सार्त्र ने आणि इतर अनेक विचारवंतानी ती संकल्पना का मांडली असेल ते कळायला लागलय. आपल्याय वाटतं आपण स्वतंत्र आहोत पण नाहीच. आपण गुलाम आहोत आपण  या समाजाचे. आपण तेच करतो जे समाजाला हवं आहे. त्या विरोधात आपण जायचे धाडस करत नाही. अन्यथा कित्येक प्रश्न सुटू शकतात. 

एक प्रसंग जो कधी विसरता येणार नाही......(काल्पनिक)

आज त्या गोष्टीला जवळपास नऊ वर्ष झालीत. विसरून गेलो होतो ते सगळं. २००३ साली मी जळगाव ला गेलो पदवी पूर्ण करण्यासाठी. सगळं नवीन होतं. पहिल्यांदाच वसतिगृहात राहत होतो. स्वतंत्र असल्याचा भास व्हायला लागला होता. वाटेल तेव्हा झोपायचं नि वाटेल तेव्हा उठायचं. सगळ कसं छान चाललं होतं. नवीन मित्र-मैत्रिणी मध्ये वेळ निघून चालला होता. पहिलं वर्ष कसं संपलं ते नाही कळल. खरं तर कळण्याचा कधी प्रयत्न नाही केला. सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरु होत्या. आनंदात जगणं सुरु होतं. जळगाव या शहरानं खूप काही दिलं. बरेच चांगले वाईट प्रसंग हि दिलेत. पण जीवनाचा एक भाग म्हणून मी ते सोडून हि दिलेत.

दुसर्या वर्षाला सुरुवात झाली होती. काही नवीन चेहरे वर्गात दिसायला लागले होते. नवीन प्रवेश घेतलेला त्यांनी एम जे कॉलेज मध्ये. पहिलं वर्ष दुसर्या कुठल्यातरी कॉलेज मध्ये केलं असेल. या चेहऱ्यामध्ये एक चेहरा माझ्या कायम लक्षात राहिला. तसं तिची नि माझी ओळख नव्हतीच. मग काय सुरु झाला तिचा विचार. माहित नाही पण तिचं ते वावरणं मला भावून गेलं. दिवसांमागून दिवस जात राहिले. माझी झोप हि कुठतरी हरवली होती. काही पण करून तिच्याशी बोलायचं होतं. पण तशी संधी ती येऊ देतच नव्हती. दोघांचे विषय हि वेगळे होते. माझी अस्वस्थता वाढत चालली होती.

मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा तिच्याशी माझं पहिल्यांदा बोलणं झालं. १४ जानेवारी २००५. मकर संक्रांतीच निमित्ता न आमच बोलणं झालं. तिथून खरी सुरुवात झाली. भेटी वाढल्या होत्या. काहीतरी निमित्त काढून मी बोलण्याचं प्रयत्न करत होतो. माझ्यासाठी ते नवीन होत. नेहमी सगळे तास करणारा मी वर्गात कमी आणि बाहेरच जास्त राहत होतो. ती कधी येते नि कधी जाते. पाठलाग करून कुठ राहते सगळी माहिती तयार होती माझ्याकडे. मला तिच्याशिवाय करमत नव्हतं कॉलेजला. ज्या दिवशी ती यायची नाही तो दिवस माझ्यासाठी निराशेचा होतं. तिला पाहिल्याशिवाय मनाला शांती मिळत नव्हती. या चक्रात अभ्यास बाजूला पडला होतं. ध्येय तर विसरलो होतो. सगळं कळून पण वळत नव्हतं.

असंच एके दिवशी ती ११ वाजता कॉलेजला आली. मी वाट पाहत होतोच. हि वेळ म्हणजे तास संपलेले असायचे. थोडं फार बोलणं झाल्यानंतर मी तिला म्हटलं “चल, चहा घेऊया बाहेर”. ती हो म्हटली. तो आंनद शब्दात सांगता येणार नाही. आणि तसा आनंद परत कधी माझ्या आयुष्यात आला नाही. तास-दोन-तास गप्पा झाल्या. नंतर ती निघून गेली. पण मी मात्र तिथेच होतो. सगळे प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत होतो. तो दिवस फार आनंदात गेला. पण हे किती दिवस चालणार. एके दिवशी सांगूनच टाकूया म्हटलं तिला. पण ते काही जमलं नाही. म्हटलं तर आम्ही रोजच भेटत होतो. पण तिला मला तू खूप आवडते अस सांगायची हिम्मत कधी झाली नाही.

तिच्या प्रेमात तीन वर्ष कसे संपलेत हे समजण्याआधीच मी जळगाव सोडण्याचा निर्णय घेतला. पुणे विद्यापीठात प्रवेश मिळाल्यानंतर तिला जाण्याआधी एकदा भेटलो. खूप गप्पा केल्या. ती बोलत होती नि मी ऐकत होतो. स्थळ होतं “पपिलोन”. ती आमची शेवटची भेट. परत तिला कधी पाहण्याचा योग आला नाही. प्रेम मनात राहून गेलं. पुण्यात गेल्यानंतर काही काळ संपर्क होता पण तो हि नंतर बंद झाला. आजही तिचा तो निरागस चेहरा आठवला कि अस्वस्थ होतो. तीची ती शेवटची भेट मी कधीही विसरू शकत नाही. तिचं ते शेवटचं वाक्य “तुला काहीतरी सांगायचं आहे पण तू नेट-सेट पास झाल्यानंतरच सांगेन”. दुर्दैवाने मला पास व्हायला तीन-चार वर्ष लागलीत. मध्यंतरी तिचं लग्न झालं असं कळाल. सगळी आशा संपली. काय सांगायचं होत तिला हा प्रश्न अजून हि त्रास देतो मला. तीही माझ्या प्रेमात होती का? तेच तिला सांगायचं होत का? कुणास ठाऊक.  हे नाही तर काय सांगणार होती ती. मला कधी कळलंच नाही. आज हि तो प्रश्न मनाला सतावतो. आजही तिची खूप आठवण येते. खूप विसरण्याच्या प्रयत्न केला. पण जेवढा जास्त प्रयत्न केला तेवढी तिची जास्त आठवण येत राहिली. तिच्यासोबत घालवलेले सगळे क्षण आठवतात.

तिला पाहण्यासाठी किती वेळा ओमकारेश्वर च्या मंदिरावर गेलो. प्रत्येक सोमवार ला ती तिथं यायची. फक्त तिला पाहण्यासाठी हा खटाटोप चालायचा. आयष्यात खूप वेळा प्रेम झालं पण तिची जागा कुणी घेऊ शकलं नाही. प्रत्येक गर्ल फ्रेंड मध्ये मी तिलाच शोधायचो. त्यामुळे कुठलंच प्रेम चार-पाच महिन्यांच्या पलीकडे गेलं नाही. मला हि त्याचं कधी काही वाटलं नाही. तिला पाहण्याची आजही इच्छा आहे फक्त एकदा. ती कुठं आहे माहित नाही आणि मी जाणून घेण्याचा प्रयत्न हि केला नाही. तरी पण ती कुठंतरी भेटेल या आशेवर जगतोय. फक्त तिला बघायचं आहे एकदा डोळेभरून.  बाकी काही नाही.

खूप वेळा वाटलं माझंच चुकलं. मी तिला सांगायला हवं होतं. पण मला गमवायचं नव्हतं तिला माझ्या आयुष्यातून या भीतीनं मी कधी काही बोललो नाही. कित्येक कठीण प्रसंगी तिनं मला साथ दिली. हक्कासारखं बोलतं होती. रागवत होती, पण काही क्षणापुरतं. तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव अजून मनातनं जात नाहीत. तिला विसरू शकत नाही पण विसरावं लागणार हे सुद्धा तेवढं च सत्य. काय होईल ते माहित नाही. पण माझं तिच्यावर प्रेम होतं ,आहे आणि राहणार. ती माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. तिच्यामुळे कठीण वाटणार्या कित्येक गोष्टी सोप्या झाल्या. मला यशस्वी व्हायचं होतं ते फक्त तिच्यासाठी. आज सगळं आहे पण ती नाही. तिला अपेक्षित असलेलं मी मिळवलं आहे हे सांगायला हि ती जवळ नाही. वाईट वाटत ते याचं. जळगाव ला गेल्यानंतर आजही आम्ही जिथं भेटायचं तिथं जातोच. नकळत भूतकाळात जातो. ती सगळी दृश्य नजरेसमोर येतात आणि मनात भावनांची गर्दी होते. जळगाव साठी आत्मीयता आहे ती तिच्यामुळे. तिला खूप शोधून झालं फेसबुक वर पण नाही सापडली. किती वेळा शोधलं. पण नाही सापडली. तरी पण आशा अजूनही आहे कधीतरी सापडेल. एकदातरी तिच्याशी बोलतं येईल. मी वाट पाहीन तिची शेवटच्या क्षणापर्यंत.  
-सचिन भगत 

नवीन वर्ष, नवीन अनुभव...


गेल्या एक दोन दिवसात बरेच एस एम एस आलेत. दूर-दूर च्या लोकांचे. हो दूरचेच कारण जवळचं खरं तर कुणी नसतंच आपल्या आयुष्यात. असतो तो फक्त भास. कारण जवळच्या लोकांना औपचारिकता पाळायची गरज नसतेच. तेव्हा जाणीव झाली कि वर्ष संपतंय. तोपर्यंत काही डोक्यात आलं नाही. नाही तरी आजकाल कुणी एस एम एस करत नाहितच. वेळ कुठं आहे आपल्याकडे असल्या फालतू गोष्टींसाठी. 

एक काळ होता खूप एस एम एस यायचे...फोन करणारे पण खूप. आजकाल आई वडील सोडले तर कुणाच फोन नसतो कधी. अन आपण केला तरी लोक उचलत नाहीत हा अनुभव. का झालं असं. परिस्थिती बदलली. सगळे आपल्या पुढे निघून गेलेत अन आपण मात्र तिथच भटकतोय. उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची आपली रीत. अशा कितीकारी गोष्टी मनात घोळत राहतात. 

कळायला लागलं तेव्हापासून कित्येक स्वप्नं पाहिलीत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पण ती काही प्रत्यक्षात आली नाहीच. म्हणून स्वप्नं नकोतच आपल्या आयुष्यात या विचारावर येऊन ठेपलो. तेव्हा कुठं आयुष्य जगायचं समाधान वाटलं. नाही तर तो स्वप्नांचा उद्योग अन त्यामागून येणारा मानसिक त्रास. जो कुणाला कळत नाही. हानी होते ती आपलीच. फक्त प्रत्येक क्षण जगायचं कुठल्याही स्वप्नांशिवाय असं ध्येय ठरवलं काही वर्षांपासून. तेव्हा कुठं आयुष्याला स्थिरतेचा भास झाला. नाहीतर पाठलाग सुरूच होता स्वप्नांचा कुठल्याही पुर्ततेशिवाय.

२०१३ संपल खरं पण काही प्रश्न अन्नुत्तरीत ठेवूनच. अजूनही त्या उत्तरांच्या शोधात आहे. नवीन वर्ष सुरु झालं म्हणून नवीन काही आयुष्यात घडते असं नाहीच. आयुष्य तेच असते अन तसच राहते अन आपण हि तेच. फार फरक पडत नाही. फक्त आपण मनाची समजूत करून घेत असतो नवीन काहीतरी होत असल्याचा. नवीन संकल्प करायचे ते फक्त पूर्ण न होण्यासाठीच. आज केलेल्या संकल्पांचा दुसर्या दिवशी विसर पडतो. तरी आपण ते काही सोडत नाही. मानवी मन नाहीतरी भरकटलेल असतच नेहमी.

अशी कित्येक नवीन वर्ष येऊन गेलीत म्हणून काही घडलं असेल वेगळ असं नाहीच आयुष्यात. मग नवीन वर्ष लागल म्हणून आनंद मानण्यासारख काही उरलंय वाटत नाही. फार फार तर ओळखी-अनोळखी व्यक्तींचे संदेश एक दोन दिवस आधीच येतात कारण जास्त पैसे पडतात ना त्या दिवशी म्हणून. या औपचारीकतेशिवाय वेगळ काही नसते. कुणी HAPPY NEW YEAR म्हटलं म्हणून वर्ष आनंदात जात नाही. तरी आपण ते पाळतो. कशासाठी आणि का याची उत्तरे आपल्याकडे कधी नसतातच. 

अस्थिरतेतून स्थिरतेकडे जाण्याचा प्रयत्न सुरु असतो नेहमी. त्याला किती वर्ष लागतील ते सांगता येत नाही. पण आशा असतेच मनात. ती कधी आपला पाठलाग सोडत नाही. एक संदेश पाठवला म्हणजे झालं असं वाटतं आपल्याला. हल्ली आपण एवढे मग्न झालोय कि तंत्रज्ञानाच्या जगात आपल्याला संपर्क करायला हि वेळ नाही. तंत्रज्ञानानं जेवढं जग जवळ आणलं तेवढं किंवा त्यापेक्षा कित्येक पटीन मना-मनांमध्ये अंतर निर्माण झालंय. हि आपली शोकांतिका म्हणावी कि काय? हे जेव्हा बदलेल तेव्हा नवीन काहीतरी घडेल. अन्यथा वर्ष येतील हि अन तसेच निघून जातीलही. त्यात आनंद मानण्यासारख काही नाही. 

-सचिन भगत

भरकटलेली यूजीसी, मस्तवाल संस्थाचालक अन त्रस्त विद्यार्थी...




एकेकाळी नेट सेट उत्तीर्ण म्हणजे हमखास नोकरी. हे समीकरण आता दुरापास्त होत चाललं आहे किंबहुना झालंय असं म्हणायला हरकत नाही. यूजीसी ने २०१० पासून परीक्षेचं स्वरूप बदललं आणि एक दीड टक्क्यांवर असलेला निकाल आता दहा टक्क्यांच्या पुढे गेला. परिणाम व्हायचा तो झाला. नेट सेट उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढली. आज अशी परिस्थिती आहे कि एका जागेसाठी शंभर पेक्षा जास्त अर्ज येतात. किंचित संस्था वगळल्या तर सगळ्या संस्था पैसे घेतात. एका जागेसाठी वीस लाखांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत.देणारे देतात पण सामान्य विद्यार्थ्यांचे काय. गुणवत्ता असून बेरोजगार राहण्याची वेळ आलीय. पैसे देण्याची ऐपत नसणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं . गुणवत्तेला कोण विचारतं. दुर्दैवाने यावर ना यूजीसी विचार करते ना विद्यार्थी संघटना. नको त्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी संघटना आता मूक गिळून गप्प आहेत. संस्था चालकांसाठी तर हे परीक्षेचं स्वरूप सोन्याची अंडी देणार कोंबड ठरलाय.

नेट सेट उत्तीर्ण होऊन पण विद्यार्थी दारोदार भटकत आहेत. त्यांना कुणी वाली नाही. खर तर हे जग सामान्य विद्यार्थ्यांसाठी नाहीच. त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी कठीण होत चालल्या आहेत. उच्च शिक्षित असून पण बेरोजगार अन नोकरी मिळणेही दुरापास्त. सध्याची स्थिती पाहता परीक्षेचं स्वरूप बदलणं आवश्यक आहे.नाहीतर डीएड-बीएड सारख व्हायला वेळ नाही लागणार. अजूनही वेळ गेलेली नाही. यूजीसी ने युपीएससी च अनुकरण करायला हरकत नाही. केंद्रीय भरती पद्धत लागू करायला हवी. जेवढ्या जागा तेवढे उत्तीर्ण करणे गरजेचे झाले आहे. संस्था चालकांना चाप लावायला हवाच. सरकार पगार देते तर संस्था चालकांचा हस्तक्षेप नकोच. पण सरकार पुढाकार घेत नाही. घेणार हि कसे. सगळ्या संस्था त्यांच्याच आहेत. 

-सचिन भगत

असंच काहीतरी......


खूप दिवसांनी काहीतरी लिहायला घेतलंय. म्हटलं तर कुठलाही विषय माझ्याकडे नाही. तरीपण काहीतरी कागदावर उतरवण्याचा प्रयत्न केला. शिकत असताना आपण खूप स्वप्न रंगवली. तासनतास चर्चा झाल्यात. पण त्यापैकी कुठल्याही स्वप्नावर आजगायत काम सुरु केलेलं नाही. कारणे अनेक असतील. ती तर नेहमी असतात. पण असं मर्यादित जीवन अपेक्षित नव्हत केल कधी. आपण आपलं जीवन बंदिस्त केलंय एका परिघात. त्यातून बाहेर पडण्याची गरज आहे आता. किती दिवस मी आणि माझं कुटुंब या संकल्पनेत जगणार आहोत आपण.हे तर कधी ठरवलं नव्हतं आपण.

मी स्वप्नं पाहणं सोडून दिलंय आता. वास्तवात जगण्याची सवय करून घेतलीय. स्वप्नांवर नाही जगता येत हे पण कळून चुकलंय आता. बारा वर्षाच्या बाहेरच्या जगात खूप काही अनुभवलं. आताकुठलाही अनुभव घ्यायची इच्छा उरली नाही. जीवन पण कस असतं. किती स्वप्नं दाखवतं पण प्रत्यक्षात काहीच येत नाही. मृगजळ आहे सगळं. आता त्यामागे लागण्यात अर्थ नाही म्हणून काहीतरी विधायक करावं म्हणतोय. काय ते निश्चित नाही. पण विचार केल्यावर काहीतरी निघेन. आयुष्य थांबल्यासारखं झालंय आजकाल. प्रत्येक दिवस येतो नि जातो. आजकाल फक्त महिना कधी संपतो नि पगार कधी हातात पडतो एवढच काय ते सुरु आहे. पगार आणि आपण. एक अदृध नातं निर्माण झालंय. पैसा आपल्याकडे येतो कि आपण पैश्यामागे धावतो काहीच कळत नाही. हेच का ते आयुष्य ज्याची आपण वाट पाहत होतो कित्येक काळापासून. माझ्याकडे उत्तर निश्चितच नाही. अन कुनाकडे असेल असंही नाही. असलंच तर कुणी स्वीकारेल हि शाश्वती नाही.

आसपास सगळं बदललं आहे. आजकाल कुणाला भेटावं असं कुणी नाहीच. जीवनातला प्रत्येक क्षण अविस्मरणीय आहे. प्रत्येकाला असे अनुभव मिळतीलच असे नाही. अनुभवांनी कधी पाठलाग सोडला नाही. भटकत असताना व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या वाक्याचा पुरेपूर अनुभव आला.जग बदलत गेलं. आसपास चे सगळे बदललेत पण मी मात्र अजूनही हि तसाच आहे. मूळ स्वभावात फार काही बदल झाला नाही. आतातर होणे पण नाही. मी खूप काही करेन असं मला नेहमी वाटायचं. सारं काही फक्त वाटलंच. प्रत्यक्षात येण्याआधीच सगळं अचानक नाहीसं झाल. कि मी नाहीसं केलं. माहित नाही.

जीवन जगणं सोपं झालंय भूतकाळाच्या तुलनेत. म्हणून प्रश्न संपलेत, अडचणी संपल्यात असंही नाही.पण ती मजा नाही येत जगण्यात. सगळं तेच तेच होऊन बसलय.लोकांचे प्रश्न ठरलेले अन आपली उत्तरे हि ठरलेली.नवीन असं काही घडत नाही. घडवण्याची ती उर्मी हि नष्ट झाली. दोन वेळेस च्या जेवणाचा प्रश्न मिटला कि व्यक्ती काही करत नाही. तसंच काही माझं झालंय.कदाचित माझी मानसिकता बदलली असेल काळाच्या ओघात.

आता शांतता हवी आहे. पण ती मिळेना शी झाली. कधीकधी हे सगळं सोडून दूर जावं म्हणतो. नको त्या अपेक्षा, नको तो संसार, अन नको ते मानवी जीवन जे फक्त पावलागणिक त्रास देतं. यासगळ्यापासून सुटका करावीशी वाटते. पण पुन्हा प्रश्न तोच अन उत्तर हि तेच. नुसतं वाटून उपयोग नाही. खरं तर उपयोगासाठी करायचं नसतंच काही. मग काय चाललंय हे. फक्त लिखाण कि मनातलं द्वंद कि अजून काही. का मनाची अस्थिरता. शेवटी मनाची घालमेल का होत असते नेहमी? आपण स्वतःला का शोधत असतो नेहमी? 

जीवन न उलगडणारं कोडं आहे. ते उलगडण्याचा निरर्थक प्रयत्न सुरु आहे. नेमकं आपल्याला काय हवं आहे. काही कळत नाही. पण काहीतरी हवं आहे. म्हणून हि सगळी खटाटोप सुरु आहे. आपण नेहमी उत्तरांच्या शोधात असतो. सोप्या गोष्टी हि कठीण करतो. सगळं आसपास असून पण नसल्यासारखं जाणवतं नेहमी. हे माझ्या बाबतीत कि प्रत्येकाच्या च. कुणास ठाऊक काय चाललंय ते. लहान असताना लवकर मोठं व्हावसं वाटतं. मोठं झाल्यावर मात्र लहानपण च चांगलं होत हि जाणीव त्रस्त करते नेहमी. आपण नेहमी धावत असतो कशाच्या तरी मागे. मिळालं तरी धावणं मात्र थांबत नाही. मग आपण धावतोच कशाला सगळं माहित असून. निष्फळ आहे सगळं. तरी त्यात अर्थ शोधण्याचा प्रयत्न सुरु असतो आपला.

आपल्याला वाटतं आपण स्वतंत्र आहोत. पण नाही. आपण स्वतंत्र नाहीच. आपण गुलाम आहोत. आपण तेच करतो जे इतरांना हवं असतं. आपण तसचं वागतो जे समाजाला अपेक्षित असतं. या पलीकडे आपण जात नाही. सगळे हेच करतात. मग कुठलं स्वातंत्र्य आहे आपल्याला. तरी आपण स्वतंत्र असल्याचा आविर्भाव आणतो नेहमी. कोण कुणाला फसवतं. आपण आपल्याला कि कुणी आपल्याला. भरकटत राहतो आपण अशा अनेक प्रश्नांभोवती. उत्त्तर नाही मिळालं तरी जगणं सुरूच असते. ते थांबतच नाही. अन आपण हि थांबत नाही. आपण शोध घेत असतो एका गोष्टीचा जी आपल्याला समाधान देईल. पण असं काही सापडतच नाही. तरी शोध मात्र सुरु असतोच अविरत. स्वतःला शोधताना आपण हरवून बसतो जे आपल्याकडे आहे. मग जे हरवलं त्याचाही शोध सुरु होतो. हे चक्र सुरु असतं सातत्याने. आपण मागे वळून कधी पाहत नाही. वर्तमानात काय आहे त्याकडे हि कधी लक्ष नसते आपलं. आपण नेहमी भविष्याचा विचार करत राहतो अन वर्तमान गमावून बसतो. अन हे कधी लक्षात येतच नाही. वेळपण कुठ असतो आपल्याकडे काय होतंय त्याचा विचार करायला. सगळं काही सुटेल पण माणसाची मिळवण्याची हाव काही केल्या सुटत नाही. आहे त्यात समाधान मानण्याची आपली नैसर्गिक प्रवृत्ती. ती फक्त दाखवण्यासाठी. खरं तर आपण समाधानी कधी नसतोच.

जगण्यासाठी धडपड सुरु आहे. ती हि संपेल कधीतरी. मग शांतपणे बसून हे सगळं आठवून वेळ घालवावा लागेल. म्हणून थांबतो. पण अनुभव थांबणार नाहीत. अधून मधून ते सुरूच राहील मग मी कितीही मग्न का असेना कामात. 

-सचिन भगत