कानावर पडलेला एक
संवाद:- स्थळ: रेल्वे स्टेशन
वडील: हे बघ, ट्रेन जातेय.
लहान मुलगा: ट्रेन...मग
ती कुठे जाते?
वडील: सगळीकडे....
लहान मुलगा: सगळीकडे कुठं?
वडील: मुंबई, नागपूर,
दिल्ली अशी सगळीकडे.
लहान मुलगा: मग या दुसर्या
ट्रेन ला काय झालं?
वडील: ती थांबलीय....गुड्स
ट्रेन आहे ती.
लहान मुलगा: मग तिला काय
झालं?
वडील: काहीच नाही.
लहान मुलगा: मग त्यात कोण
जाते?
वडील: आपण नसतो जात
त्यात. सामान ने ने-आण करतात.
लहान मुलगा: कोणते सामान...
वडील: सगळं...आपल्याला जे
जे लागते ते गुड्स ट्रेन ने येते. तुला सायकल घेतली ना,,,ती पण गुड्स ट्रेन मध्ये
आली होती.
लहान मुलगा: मग आपण पण जाऊ ट्रेन गुड्स ट्रेन मध्ये...
वडील: आपण नसतो जात त्यात
. आपण पसेंजर ट्रेन मध्ये जातो.
लहान मुलगा: मग पसेंजर
ट्रेन मध्ये कोण असते?
वडील: लोकं असतात. ते
प्रवास करतात.
लहान मुलगा: आपली ट्रेन आहे ही?
वडील: नाही.
लहान मुलगा: मग कुणाची
आहे?
वडील: ती गव्हर्नमेंट ची
असते.
लहान मुलगा: मग गव्हर्नमेंट
कुठे राहते?
वडील: अरे बाबू, गव्हर्नमेंट
एक संस्था असते.
लहान मुलगा: मग गव्हर्नमेंट बोलते का आपल्याशी?
वडील: नाही.
लहान मुलगा: मग आपल्याशी का बोलत नाही?
वडील: ती बोलत नाही.
लहान मुलगा: मग आपण रोड
वर आणू ट्रेन ला.
वडील:ती रोड वर नाही येत.
लहान मुलगा: मग ती कशी
चालते.
वडील: ती track वर चालते.
चल आता आपण घरी जाऊ.
...................................................................................................................................................................................
सचिन भगत
(९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव