ओढून-ताढून लिहिलेलं काही...
वर्षातन किती डेज्स येतात. काय-काय साजरं करावं माणसानं? आता नुकताच फ्रेन्डशिप डे होऊन गेला. किती सारे whatsapp मेसेजेस आलेत. नवीन नाही तेच तेच. बर गम्मत अशी कि मित्र नसताना हि मेसेज आले. कळेना काय झालंय लोकांना. ते तंत्रज्ञान वापरतात कि तंत्रज्ञान त्यांना. खरं बोलायची
हि पंचाईत. फेसबुक फ्रेंड झाला म्हणजे काय मित्र झाला व्हय? १९९७-९८ ची गोष्ट. त्यावेळी मैत्री वगैरे या गोष्टींचा मागमूस हि नसतो. आमच्या गावाकडे देवीची यात्रा असते. एक मित्र शोधत शोधत शेतापर्यंत जिथं तो काम करत होता तिथपर्यंत गेला. आणि मग ते दोघं सोबत यात्रेला गेले. शिकायला फक्त एक वर्ष सोबत होते ते. नंतर एकाने शाळा बदलली. पण तो भेटत राहिला. नंतर मात्र ते कित्येक वर्ष सोबत राहिले. वादविवाद झाले असं नाही. भरपूर होतात. पण त्याचा त्यांच्या मैत्रीवर कधी परिणाम झाला नाही. एखादी गोष्ट हक्काने मागून घेतात. त्यात व्यवहार आला नाही. ते दोघं जळगाव ला असताना आणखी एक मित्र जोडला गेला. त्या तिघांचे स्वभाव एक आहेत असं नाही. मत पटतील असंही काही नाही. प्रत्येकाची स्वतंत्र विचारसरणी आहे. ते सर्व बाजूला ठेवून ते एकत्र आले. त्याला ओर्गानिक बॉंड म्हणतात ते. वेळप्रसंगी एका डब्यात दोन हि अड्जस्त झालेत. मी भात खात नाही म्हणून भूक असताना तो कित्येकवेळा तसाच पडून राहिला. व्यापामुळे संवाद होत नसेलही पण त्यातला ओलावा कायम असतो. अडचण आली तर हक्काने तर कधी शिव्या देवून काम
करून घेतो. यानंतर त्यांच्याशी कित्येक जण जोडले गेलेत. पण तिघांमध्ये चौथा आला नाही. प्रत्येकाचं स्वतंत्र सर्कल आहेच. अधूनमधून भेटीगाठी होतातच. कधी अनपेक्षितपणे तर कधी ठरवून. असंख्य आठवणीआहेत सोबत असण्याच्या.
ते HDFC via Omkareshar
temple पायी चालत जाने असो,
कि तिच्यासोबत
चांदणी चौकात असो,
हनुमान, केटी, गुबगुब, एलेन, असो
कि तो लांब प्रवास
ग्रंथालयातील प्रपोझ नाहीतर कॉलेजमधील कट्ट्यावरच
कधी तास सुरु असताना वाचायला दिलेलं आर्टिकल
आणि त्यातला मैत्रीतला प्रेमभंग
नाहीतर शेवटची राजाची राणी
इतिहास तोंडपाठ आहेच कि.
मैत्रीत प्रेम असतेच ना.
सुरुवातीला मैत्री आणि नंतर बहरत गेलेलं प्रेम,
अचानक वेगळे झालेले मार्ग अन त्यातून प्रेमभंग,
प्रेमभंगातून निघत नाही तर दुसरं प्रेम आणि बरंच काही.
प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी प्रकरणं.
कधी कधी स्लामबुक चं वाचन, सिमिलर इव्हेंट्स असं कित्त्येक आणि काय...गायब केलेली अंडरविअर अजून सापडली नाही. शोध सुरु आहे.
धार्मिक नसताना त्या ओमकारेश्वर मंदिरात किती चकरा झाल्या असतील? कशासाठी? दर्शनासाठी? पण कुणाच्या? देवाच्या?... त्या देवालाही बोलावं वाटलं असेल कि बसं बाबा आता. परत येताना भल्यामोठ्या इमारतींकडे पाहणे आणि एक विशिष्ट इमारत सामोर आली कि “सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही वाटत, बांधकाम कसं आहे हे.” हे नेहमीचं वाक्य. मोर्निंग वॉक किंवा इव्हिनिंग वॉक हे तर त्या शहरात गेल्यानंतर कळाल. (श्रीमंत लोकं रात्री जेवण झाल्यांनंतर बाहेर फेरफटका मारतात त्याला मोर्निंग वॉक म्हणतात.) गावाकडच्या लोकांना त्याचा मागमूस हि नसतो. दिवसभर शेतात राब राब
राबायचं आणि रात्री जेवल्यानंतर कधी झोप लागते त्यांनाही कळतनाही. त्यांच्या आयुष्यात कुठंआलाय वॉक. त्यांच्या आयुष्यात फक्त धावणं असतं. त्या कॉलेज ते HDFC किती वाक झाले असतील. सगळं कसं नचरल वाटलं पाहिजे ना? शेवटी लग्न आणि हा भूतकाळ बंदिस्त. अधूनमधून भेटी झाल्या कि हा बंदिस्त भूतकाळ पुन्हा एकदा ताजातवाना होतो. चर्चा, हास्यकल्लोळ , खेचाखेची आणि काय नाही?
जो टिका करतो परंतू मैत्री तुटण्याच्या भीतीने सावध राहतो, तो मित्र नाही. - गौतम बुद्ध
जीवन एकट्याने चालण्याची प्रक्रिया नाहीच. ते कसं असेल ते आसपासची लोकं ठरवतात. व्यवहारी जगात आपुलकीने विचारपूस करणारी मानसं हवीत. पैसा पाहून आपल्याकडे आलेली तर कित्येक सापडतील.
मैत्री परिस्थितीचा विचार करत नसते, जर विचार करत असेल तर समजून घ्या मैत्री नाहीये. - मुन्शी प्रेमचंद
मी आहे हा असा आहे, पटले तर घ्या नाही तर सोडून द्या...हा विचार त्यांनाही पटलेला. पूर्वी पत्र लिखाण चालायचं...आता त्याची जागा सोशल नेट्वर्किंग नं घेतलीय. फ्रेन्डशिप धाग्यान काय ते घट्ट होते. नाहीच ना. मन जुळली पाहिजेत. तिची आठवण म्हणून त्याने तो धागा आता आतापर्यंत जपून ठेवला होता. काय तर म्हणे तिने बांधलेला धागा आहे तो मैत्री दिनानिमित्त. अरे पण मैत्री होती ना? मग त्याला काय आलीय या धाग्याची गरज? धाग्याने बांधून मैत्री नाहीच टिकत. एकमेकांच्या सुखदुखात सामील झालं कि या धाग्याची गरज नाही पडत. तिच्यासाठी तो आता भूतकाळ झालाय. तू का अडकून पडतोय यात? आता कुणी सांगावं त्याला कि भूतकाळ फक्त त्रस्त करतो. जर तर ची भाषा शिकवतो. जाऊ द्या काय काय सांगावं...जळगाव मधल्या त्या होस्टेल पासून ते पुण्यातल्या चांदणी चौकापर्यंत चे अनेक प्रसंग आहेत. माझं-तुझं म्हटल्या पेक्षा सार आपलच.