Tuesday, January 28, 2020

१०१ नेमकं ५...


स्त्री-पुरुष भेद या विषयावर कित्येकदा वाचनात आलं. मग हे सगळं पुरुषप्रधान कसं झालं. याला अनेक बाजू आहे. त्यातली एक बाजू. ती म्हणजे भाषा. भाषा सुद्धा पुरुषप्रधान आहे. कित्येक शब्द  किंवा  वाक्ये पुरुषप्रधान संस्कृतीचे द्योतक आहेत.  त्याबद्दल थोडेसं...
लहानपणापासून मी Practice makes a man perfect हे वाक्य ऐकत आलोय.
 But it also makes a woman perfect. मग याचं काय? तर आपण Practice makes a person perfect. असं म्हणू शकतो. म्हणजे Neutral.
रोजच्या वापरात येणारे स्त्री-पुरुष भेद करणारे काही शब्द (कंसात Neutral शब्द दिलेले आहेत):
·         Policeman (Police Officer, Police Personnel)
·         Chairman (Chairperson)
·         Mankind (People, Human Beings)
·         Manmade (Artificial)
·         Common Man   (Common Person, Average Person)
·         Delivery Boy    (Courier, Messenger )
·          Landlord   (Proprietor)
·         Salesman   (Sales Agent)
·         Manpower (Work Force, Employees)
·         Businessman (Entrepreneur)
·         Housewife  (Homemaker)
·         Spokesman  ( Spokesperson)
·         Brotherhood   (Kinship)
·         Man-Hour ( Staff Hours)
·         No-Man’s-Land    ( Unclaimed Territory )
अशी असंख्य उदाहरणे आहेत. आपण ती सर्रास वापरतो.
त्या संदर्भात काही वाक्य पाहूयात:
·         Each student must meet his tutor. (All students must meet their tutor.)
·         The applicant should submit his resume tomorrow.(Submit your resume tomorrow.)
·         I pray God.  (I pray Almighty.)
Gender-biased भाषा जोपर्यंत वापरात आहेत तो पर्यंत आपण बदल अपेक्षित करू शकत नाही.
इतिहास, संस्कृती, धर्म आणि भाषा यांनी वर्षानुवर्षे स्त्री-पुरुष असमानता पसरवली, रुजवली आणि वाढीस नेली. पुरुषांना नेहमीच वरचे स्थान दिलंय यांनी. अनेकदा आपण पुल्लिंग ला उद्देशून बोलतो.  हे लिंग भेद नाही तर काय?
आता Wo-man आणि Fe-male या शब्दांचं बघा. Man आणि male हे काय दर्शवते?
म्हणजे काय की Gender inequality is still a reality.
संशोधनाने हे सिद्ध झालंय जसं आपण बोलतो तसच आपण विचार करतो. त्यामुळे हा भेद दिवसेंदिवस पुरातन काळापासून वाढीस लागला आहे.  डिजिटल प्लॅटफॉर्म च्या प्रवेशाने याला अधिक बळकटी येण्याची संभावना आहे.

भाषा ही पुरुषसत्ताक आहे. दैनंदिन बोलण्यातून अथवा लिखाणातून ती व्यक्त होत असते.
परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे.
चला तर मग एक छोटासा बदल करूयात. आपण वापरात असलेले Gender-biased words किंवा sentences हळू हळू हद्दपार करूयात. बदलास हातभार लावूया. (Let us make our language free from gender discrimination).


सचिन भगत (9922127385)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव