१: हलो, बोल, कशी
काय आठवण केलीस इतक्या दिवसानंतर...
2: आठवण वगैरे काही नाही...मला एक काम होतं म्हणून
फोन केला...
१: काय काम आहे ते...
२: काही नाही अमुक-तमुक विषयाचं मटेरीअल पाहिजे ...क्लासेस सुरु करायचे
आहेत...
१: बरं...
२: बरं काय...लगेच मेल कर...
१: हो करतो...बाकी काय
२: बाकी वगैरे काही नाही...मी कामात आहे
...बाय.
१: ओके... (तिकडून फोन
कट)...बाय...टिक..टिक...टिक..
(मनातल्या मनात: मटेरीअल कुठं शोधायचं ...जाऊ
दे...कशाला वेळ वाया घालवायचा ....तंत्रज्ञानाने आपण व्यवहारी झालो
वाटते...कित्येक दिवसानंतर फोन करायचा आणि कसा आहेस...काय चाललंय वगैरे न विचारता
डायरेक्ट काम...आपण मानसं आहोत यंत्र नाही बटन दाबलं की काम सुरु व्हायला...हल्ली
मी पण तेच करतो...काम असलं कि फोन नाहीतर नाही...मग कुठं जग जवळ आलंय...उलट
आपल्याला काम असलं कि समोरचा कधी हि केव्हाही संपर्कात येतो एवढा काय तो फरक...
सोशल नेट्वर्किंग वर पण आलेले मेसेज फोरवर्ड करण्यापलीकडे काय असते हो...मी
पाठवलेला एक मेसेज मला १५-२० वेळा वापस येतो...बरं संवाद झाला तरी ती
औपचारिकता...यापलीकडे कधी जाता येईल...? विणलेली नाती
अधिक घट्ट करता येईल? कितीही प्रयत्न केला तरी उत्तर काही
मिळत नाही...तसंही वेळ कुठं आहे फालतू विचार करायला… )