गेल्या
शनिवार ला गावातील लग्नानिमित्त नाशिक ला जाने झाले. ८-९ तासांचा प्रवास होता
त्यामुळे सकाळी तीन ला प्रवास सुरु झाला. लग्न तसं संध्याकाळच. त्यामुळे दिवस
तिथेच जाणार होता. नाशिक ला माझा एक मित्र आहे. तसे ओळखीचे बरेच आहेत. याआधी नाशिक
ला बऱ्याच वेळा गेलो पण त्याला काही भेटता आलं नाही. म्हटलं या वेळी त्याला नक्की
भेटावं. सकाळी ६ च्या आसपास मी त्याला फोन केला. पण त्याने काही प्रतिसाद दिला
नाही. मला वाटलं झोपला असावा. एक-दीड तासाने पुन्हा पुन्हा फोन केला पण प्रतिसाद
नाही. सकाळी १०-११ च्या आसपास आम्ही नाशिक ला पोचलो. तेव्हा अजून फोन केला पण काही
उत्तर नाही. म्हटलं जाऊ द्या आता. तिथे मंगल कार्यालयात व्यवस्था होती. दुपारचे जेवण झाल्यावर पंचवटीत फेरफटका मारायला
निघून गेलो. एवढा वेळ काय करायचं कारण लग्नाची वेळ होती संध्याकाळची सात वाजता. तिथे
मी त्या मित्राला अजून एकदा फोन केला.
एवढे
फोन केल्यानंतर तेव्हा त्याचा रिप्लाय आला....
In supervision. Call you later. If urgent,
text me.
मी
उत्तर दिल....I am in Nashik.
त्याचा
रिप्लाय आला...Congratulations. But why are
you here?
त्याच्या
या उत्तराने मी स्तब्ध झालो. मी विचार केला नाशिक आलो तर congratulation सारखं
काय आहे त्यात. आणि But why
are you here? हा काय प्रश्न झाला का?
मुळात
या उत्तराची अपेक्षा नव्हती. कुणी आपल्याला भेटायला आलं कि आपण लगेच कुठे आहेस, मी
येतो, भेटू वगैरे याची अपेक्षा होती. पण झालं उलटंच.
मी
त्याला रिप्लाय दिला...Zak
marayala aaloy Nashik la.
तिकडून
त्याचा मेसेज ...ka re kay
jhal?
मी
मेसेज केला...salya Nashik la aahe tar why
are you here mhanato. माझा पारा सटकला होता त्यामुळे
मी काय चांगला रिप्लाय देऊ शकत नव्हतो.
मग
त्याचा मेसेज आला...kiti vel
aahes ikada? Ghari ye? Are mala vatal interview vagaire aahe ki kay so just
asked the reason. Asahi tu baryachda yeto Nashik la pan mala kuth sangato. Mi
5.30 la free hoil. Bhet. Aata kuth aahes. Will call you at 6.00.
मी
काहीच उत्तर दिलं नाही. जाऊ द्या म्हटलं. म्हणून त्या मंगकार्यालयात टाईमपास सुरु
केला. नाहीतरी लग्नाच्या ठिकाणी कंटाळवाणे होत नाही. वातावरण कसं हिरवेगार, वसंत
ऋतू त जशी वृक्षांना पालवी फुटते ना तसं असते. असे प्रसंग म्हटलं कि सगळे कसे नटून थटून येतात. प्रत्येकाला वाटते आपण उठून दिसलो पाहिजे.
काहीच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह तर काही अतिशय गंभीर.
संध्याकाळी
६.०० ला त्या मित्राचा मला फोन आला. तसा मी अपेक्षित केला नव्हता. म्हटला मी घरी
जाऊन फ्रेश होतो आणि तू सांगितलेल्या ठिकाणी भेटायला येतो. मी म्हटलं ठीक आहे. आणि
पुन्हा मी मग त्या मंगलकार्यालयात भटकंती सुरु ठेवली. यात एक तास निघून गेला.
लग्नाची वेळ झाली होती. मी मात्र त्या
मित्राची वाट पाहत होतो. लग्न लागून झालं. निघायला ४-५ तास बाकी होते. मी त्याला फोन
केला. तो म्हटला, मी बाळाला घेऊन हॉस्पिटल ला आलोय. येतो एखाद्या तासात.
मी
जेवण उरकून घेतलं. आणि पुन्हा बसलो त्याची वाट पाहत. तिकडे फोटोसेशन सुरु होतं.
वेगवेगळ्या पोझ मध्ये फोटो काढण्याची धावपळ सुरु होती. खूप गर्दी झाली होती. प्रत्येकजण
जोडप्याला शुभेच्छा देत होता. मी ते पाहत बसलो.
८
वाजे च्या आसपास मी त्याला पुन्हा फोन केला. म्हटलं अरे कधी येतोय. त्यावर तो
म्हटला, अरे मी खूप थकलोय. आता खूप उशीर झालाय. मला यायला अर्धा-पाऊन तास लागेल.
त्यापेक्षा तूच ये माझ्याकडे. उद्या सकाळी जा.
त्याचं
बोलणे झाल्यावर मी म्हटलं...पाहतो आणि मी फोन कट केला.
त्यानंतर
ना त्याने मला फोन केला आणि ना मी त्याला.
रात्री
१२.०० च्या आसपास आमचा परतीचा प्रवास सुरु झाला आणि सकाळी ६ च्या आसपास घरी पोचलो.
कालचा
दिवस भूतकाळात जमा झाला. काही गोष्टी तिथेच सोडून द्यायच्या असतात. मी त्यावर विचार
हि केला नाही. भेटणे न भेटणे हा ज्याचा त्याचा प्रश्न. आपण अपेक्षा करू नये. आता
प्रत्येक मित्राच्या बाबतीत असं होते असं नाही. काही तर वेळेआधी आपल्याला घ्यायला
येतात आपण येत असलो कि.
जुने
मित्र भेटले कि भूतकाळातल्या आठवणी जाग्या होतात. इकडची-तिकडची विचारपूस होते.
बाकी काही नाही.
(प्रसंग
जसा घडला तसा शब्दबद्ध केलाय. सौंदर्यीकरण केलेलं नाही.)