व्लोग (Vlog)...अलीकडे प्रचलित
झालेला शब्द. आपल्यापैकी कित्येकांना माहित नाही.
व्लोग ची व्याख्या अशी:
“a video blog: a record of your thoughts, opinions, or
experiences that you film and publish on the internet.” (https://dictionary.cambridge.org/dictionary/english/vlog)
थोडक्यात व्हिडीओ ब्लॉग (Video Blog). वेब
टेलेव्हिजन (Web Television) चा एक प्रकार. व्हिडीओ च्या माध्यमातून
जाहिरात करणे, माहिती पोचवणे, जागरुकता निर्माण करणे, मनोरंजन करणे ई. पूर्वी
ब्लॉगिंग ला सपोर्ट म्हणून व्हिडीओ जोडले जायचे. आता मात्र व्लोगिंग एक स्वतंत्र
क्षेत्र निर्माण झालंय.
साधारणतः २००५ नंतर व्लोगिंग
मध्ये प्रचंड वाढ झाली. यु ट्यूब हे व्लोगिंग लोकप्रिय माध्यम. एक प्रकारची
मोनोपोली आहे यु ट्यूब ची.
पूर्वी सोशल नेट्वर्किंग
ला फक्त लिखित माहिती, फोटो, कधी कधी व्हिडीओ असायचे. फेसबुक वर नाही का आजकाल व्हिडीओ अपलोड करणे
सुरुय. दृक-श्राव्य आपल्याला जास्त भावते. कारण लिखाणातून व्हिजुअल्स, भाव दाखवता
येत नाही. त्यामुळे वाचक ते गंभीरतेने कदाचित घेणार नाही. त्यामुळे व्हिडीओ अपलोड
करण्यावर भर दिसतोय. न्यूज चनेल चं
उदाहरण घ्या. त्यांनी किती व्हिडीओ अपलोड केलेले असतात. सोशल नेट्वर्किंग (फेसबुक, ट्विटर, इंस्ताग्राम,
whatsapp) वर आजकाल व्हिडीओ जास्त फोरवर्ड केले जात आहे.
स्मार्ट फोन सामन्यांच्या
हाती पडला; त्यात जिओ ने इंटरनेट डेटा सहज उपलब्ध करून दिला आणि यु ट्यूब
वापरणार्यांची संख्या प्रचंड वाढली.
आजकाल प्रत्येक जण आपला
वेळ मोबाईल वापरण्यात घालवतो. शहरी-भागापुरत
ते मर्यादित न राहता ग्रामीण भागात ही विस्तारलं आहे. हिच संधी व्लोगर्स नी टिपली.
कित्येक व्लोगर सक्रीय
आहेत यु ट्यूब वर. एखादा नवीन स्मार्ट फोन बाजारात आला की त्याचे reviews सहज उपलब्ध होतात. म्हणजे
काय कुठलाही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस बद्दल माहिती व्हिडीओ च्या माध्यमातून. ग्राहकांना
येणाऱ्या समस्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करतात व्लोगर्स. तुम्ही काही पण टाईप
करा. असंख्य व्हिडीओ दिसतात.
फायदे:
•भेट देणार्याची संख्या वाढते
•अपिलिंग
•जाहिरातीसाठी उत्तम माध्यम , product किंवा service चांगल्या प्रकारे दाखवता
येते
•खिळवून ठेवते
•आत्मविश्वास वाढतो
•बोलताना वाटणारी भीती नाहीशी होते.
व्लोगिंग मध्ये वेगळं पण
चांगलं करिअर घडवता येऊ शकते. फक्त content
दमदार पाहिजे.
तसंही आपण म्हणतोच की Content is the king. हे एका रात्रीत
होत नाही. वेळ लागतो. मेहनत लागते.
यु ट्यूब वर स्वतःच चनेल
सुरु करून आपण अमर्यादित व्हिडीओ अपलोड करू शकतो. ते ही कुठलीही फी न भरता. मोफत
आहे. यु ट्यूब Video Hosting निशुल्क पुरवते.
छोटे-छोटे व्हिडीओ तयार
करून नियमित पणे अपलोड करायला सुरुवात करायला हरकत नाही. आपल्याकडे काय हवं तर एक व्हिडीओ
कॅमेरा, इन्टरनेट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कल्पना. बघणाऱ्यांची संख्या जशी जशी
वाढत जाईल तसं तसं कमावण्याचा एक मार्ग उपलब्ध होऊ शकतो.
काळ झपाट्याने बदलतोय.
प्रत्येक क्षेत्रात आमुलाग्र बदल होत आहेत. काळानुसार चालायचं तर नव-नवीन गोष्टी शिकायला
हव्यात.
सचिन भगत
(९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव