Friday, August 4, 2017

व्यथा त्याची...

दोन वेळेसच्या भाकरीचा प्रश्न
कधी त्याला गुलाम बनवतो
तर कधी बेशरम
दिवसभरात कानांवर होणार बलात्कार रोखणार कसे?
सर्व सोडून तो चालत राहतो
कधी मुलाबाळांसाठी तर कधी कुटुंबासाठी
कधी थांबणार त्याची हि व्यथा?
फिकीर नेहमी त्याला भविष्याची
सवय लावते वर्तमान विसरायची.
कधी कधी तो हि कंटाळून जातो
पण संध्याकाळी चिमुकल्याचा चेहरा पहिला कि
तो पुन्हा उमेदीनं जगण्याचं ठरवतो.

सहन करतो होणारे अत्याचार निमुटपणे
रंगीबेरंगी स्वप्ने पाहत
कधीतरी हे चक्र थांबेल या आशेवर
पण ते नाही थांबलं तर
जीवन तर थांबतेच ना?
सुटका म्हणावी कि अजून काय?
जीवनापासून त्याची सुटका कि
जीवनाची त्याच्यापासून?
फक्त आणि फक्त अनुत्तरीत प्रश्न.
                           सचिन भगत