कोरोना.....ओघाने येणारं lockdown.....वाटेल
तिकडे भ्रमंती करणारे अचानक घरात बंदिस्त केल्या गेले.....वेळ कसा घालवायचा म्हणून
सोशल मेडिया वर विविध टास्क/challenge येऊ लागले.........
...................वेगवेगळे पदार्थ (केक, ढोकळा, इडली, पोहे, मटन/मासे....) बनवून स्टेटस यायला लागले, आज हे
..उद्या ते....साड्या घालून सेल्फी टाकून झाल्या, टक्कल केलेली फोटो टाकल्या गेले,
मेक-अप विना चा सेल्फी चा टास्क हि येऊन गेला...कुणी लिखाण केलं, कुणी गाणी गायली,
स्त्री-पुरुष यांच्या कामांची आदलाबदल करून झालं…......lockdown संपल्यावर मी कुणासोबत
जेवणार, कॉफी घेणार सारखे ट्रेंड आलेत.........कुणी फेसबुक लाइव येऊन भाषण ठोकायला
लागलं...प्रतिकारशक्ती कशी वाढवायची......मास्क कसा बनवायचा....खान-पान कस असलं
पाहिजे चे उपदेश....तणावमुक्त जीवन कसे जगायचे तसेच योगा/व्यायाम चे व्हिडीओ उपदेश...........फेसबुक/टीक-टोक/इंस्ताग्राम/ट्विटर
वर अशा व्हिडीओ/पोस्ट/स्टेटस चा पाऊस
पडला....वेबिणार, झूम अशी किती मोठी लिस्ट....हेच काय तर चड्डी कोण धुणार हा वाद हि
विकोपाला गेला...चर्चा झडल्या....
हे सारं करत असताना आपल्या आसपास काय
सुरुय याचा गंध आपल्याला कधी आला नाही....समजला नाही किंवा काही देणेघेणे नाही
म्हणून सोडून दिलं असेल कदाचित...मग्न आहोत आपण आपल्या प्रपंचात....
चायना मधून आलेल्या कोरोना ने हाहाकार केला....
सार्या जगात. लॉकडाऊन ने संपूर्ण जग स्तब्ध झालं...विकासाच्या गप्पा किती हि करा ,
निसर्गानं ठरवलं कि सारं समाप्त...या निमित्तानं मानवी बुद्धी ची मर्यादा उघडी
पडली...
शास्त्रज्ञ, डॉक्टर सारे कामाला
लागले...औषध सापडेल...लस येईल ... कोरोना निघून हि जाईल...पण माझ्या मनात अनेक प्रश्न
आहेत त्याची उत्तरे कधीच सापडत नाहीत....कदाचित सापडणार हि नाही.................
कोरोना चं जेव्हा भारतात संक्रमण सुरु
झालं तेव्हा सुरुवातीचे काही दिवस तर लोकांनी टिंगल-टवाळी सुरु केली...राजकीय
नेत्याच गो करोना गो पासून ...मिम्स, जोक्स चा भडीमार झाला....नन्तर हेच लोकं
त्याला जातीय रंग देण्यात गुंतले...हि लोकं कोण तर बहुतांशी सुशिक्षित. कारण गरीब
लोकं समाज माध्यम वापरत नाहीत. कुठलाही आजार धर्म पाहत नाही ऐवढं साध logic
आपल्याला कळू नये हि या देशाची शोकांतिका....
कोरोनामुळे सगळ्यात जास्त बाधित/प्रभावित
तर गरीब लोकंच...पगारदारांना चिंता नाही....महिना झाला कि पगार खात्यात येतो...
गरिबी ...कित्येकांच्या पाचवीला
पुंजलेली....जन्म झाला तेव्हापासून संघर्ष सुरु.....कुणी किती प्रयत्न केले
निर्मूलनाचे.....करोनाच्या निमित्ताने शेकडो किमी पायी चालणारे मजूर पाहिले...लहान
लहान मुलं पाहिली....कुणी त्यांची मदत केली? पोकळ घोषणा झाल्या...प्रसिद्धी
झाली...पण मदत पोचली का?
काय ती इच्छा शक्ती...जी साधं जगू हि
देत नाही आणि मरू हि देत नाही...चालण्याशिवाय पर्याय नाही...पायी चालताना भुकेने
मृत्यू झालेले पाहिले...अजून काय पाहणार?......जमेल तसं करून लोकं घराच्या दिशेकडे
निघाले....कुणी पायी, कुणी सायकल वर.......त्या दृश्यांच्या बातम्या झळकल्या....आर्थिक
महासत्ता बनू पाहण्याचं स्वप्न किती तकलादू आहे हे समजल असेलच...जे राष्ट्र स्वतःच्या
लोकांचं जीवनमान उंचावु शकत नाही, आणीबाणी च्या परिस्थितीत त्यांची मदत करू शकत
नाही, लोकांकडून देणगी गोळा करण्याचं आवाहन करते......प्रगती कशी म्हणता येईल?
जीडीपी वाढला, वाढतोय हा आकड्यांचा खेळ...गरिबांना
आकडेमोड येत नाही....पोटाची भूक सर्वात महत्त्वाची...हीच ती भूक...जी काहीही
करायला भाग पडते....जगण्याचा संघर्ष म्हणा, नशीब म्हणा कि अजून काही....पण याला
सामोरे कसं जायचं याचं नियोजन कुणाकडेही नाही..............
हात मजूर, कामगार यांचे हाल आपण सर्व
पाहतोच आहे. हाताला काम नाही... पोटाला भाकर नाही...तूच सांग देवा काय करावं या
लोकांनी....
..........घंटानाद झाला, दिवे लावून
झाले, “आत्मनिर्भर व्हा” असा सल्ला देवून झालं, package ची
घोषणा झाली..........पण या या गरिबांच्या आयुष्यात उजेड पडला का, मदत पोचली का?
.....याचं उत्तर नाही असंच आहे....तरी आम्ही हे करतोय, ते करतोय याचा ढोल पिटवत
राहायचा....हे करणार...ते करणार ची आश्वासने....आकडे फेकत राहायचे....इतक्या
लोकांना घरी पोचवलं,.....इतके पैसे गरिबांच्या खात्यात टाकले........इतके
अन्न-धान्य वाटप करण्यात आले...... स्थलांतरित मजुरांसाठी एवढ्या ट्रेन तयार आहेत
वगैरे वगैरे..........आणि बिकाऊ मेडिया ने त्यांच गुणगान करायचं...........आकडे....आकडे
आणि फक्त.......... आकडे.........संवेदना बोथट होत चालल्याचं ते लक्षण...
“मन कि बात” असो कि “फेसबुक लाइव”……………....शब्दांनी पोट भरत नाही....................भुकेल्या पोटी मनोधैर्य वाढत नाही हे
कुणी सांगावं?
………..खर्या अर्थानं गरिबी दूर करावी असं
कुणाला वाटलं नाही.....त्यावर राजकारण मात्र होत राहिलं............ कोरोना आज ना
उद्या जाईल...पण गरिबीचं काय/ ती कशी घालवाल...याचं उत्तर कुणाकडेही नाही.
कोरोना ची साखळी मोडावी म्हणून उपाय
योजना सुरु आहेत.............कधी गरिबी ची साखळी मोडावी असं वाटलं....नाहीच.....................
.
स्वातंत्र्यापासून समित्या वर समित्या
स्थापन होत राहिल्या...योजना येत राहिल्या....कागदपत्री हजारो कोटी खर्च झाला....पण
गरिबी काही दूर झाली नाही.............
कोरोना हा साथीचा आजार भयानक आहे पण
त्यापेक्षा गरिबी हा साथीचा आजार जास्त भयानक आहे. त्यातून कसं वाचायचं?.................
सरकार कुणाची असो गरिबांच्या आयुष्यात
कधी बदल झाला नाही. परंपरागत तसंच आहे...............गरिबी सारखा महाभयानक साथीचा
रोग आजपर्यंत आला नाही.......पण त्यावर उपाय करावा...निर्मुलन करावं असं कुणाला
वाटलं नाही.....
मुठभर लोकांकडे अगणित पैसा तर एकीकडे बहुसंख्य
लोकांची दोन वेळेस च्या जेवणासाठी चाललेली धडपड....किती हि विषमता......
लोकांना करोना चं गांभीर्य नाही असं
कित्येक लोकांच्या तोंडून ऐकलं...त्या लोकांचं जीवन पाहिलंय कधी...कामाला जातो
तेव्हा घरात स्वयंपाक होतो ...या lockdown मुळे काम नाही....तर दाम नाही. कसे घरात
थांबणार लोकं? बाहेर पडणारच...पोटासाठी....घरात असलेल्या मुलाबाळांसाठी....
चांगल्या पगारावर असलेल्या किती लोकांनी मदत केलीय गरजूंना? ....
याचं गरिबांच्या आयुष्यावर लिखाण करून
लोकं नामवंत पत्रकार झाले, लेखक झाले आणि बक्कळ पैसा कमवू लागले...त्यांच्या
प्रश्नांवर आंदोलनं करून सत्ता मिळवणारे हि अनेक.............................................आताही
तसंच होईल...................................lockdown मुळे लोकांचे कसे हाल झालेत
यावर पुस्तके येतील....वर्तमानपत्रात लेख येतील...कथा-कादंबर्या-कविता लेखन होईल, टीव्ही
channel वर गप्पा झडतील....पण पुढे काय? हीच
लोकं खरे लाभार्थी...मेलेल्यांच्या टाळू वरचं लोणी खाणे ते हेच...
या lockdown मुळे लोकं कोरोना पासून
वाचतील पण त्यांना भुकेपासून कोण वाचवणार?
हा अनुत्तरीत प्रश्न................गरिबांच्या नशिबी गरिबी....गरिबी आणि फक्त
गरिबी....
सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव