२०१४ हे वर्ष फार काही लाभदायक ठरलं नाही. अपवाद
फक्त एका गोष्टीचा. नवीन वर्षाची सुरुवात करताना आपण नेहमी नवीन संकल्प करतो.
आजपर्यंत मी पण हेच केलं. या वर्षी मात्र
मी कुठलंही संकल्प केला नाही. जशी परिस्थिती येईल तसं जगायचं ठरवलं. म्हणून कुणाला
संदेश पाठवला नाही कि फोन केला नाही. नवीन वर्ष सुरु झालं म्हणून जीवनात कुठं काय
नवीन घडणार आहे. मागील वर्षाचा विचार केला तर पुष्कळ गोष्टी सांगता येतील. मात्र प्रत्येक गोष्ट स्पष्ट सांगता येणार
नाही.
या वर्षात काही जवळची मित्र दूर झालीत.
मना-मनांमधील दुरावा वाढला. तो नाहीसा होनेपण शक्य नाही. आणि मला नाहीसा पण करायचा
नाही. एखाद्या नात्यामध्ये मन गुंतवण पण सोडून द्यायचं ठरवलंय. चूक माझीही असेल
किंवा आहेच. पण मला तसंच जगायचं आहे. आणि मी पण मन घट्ट केलंय. मुक्तपणे जगायचं
ठरवलंय. कुठंही मन गुंतवायच नाही. व्यावहारिक जीवनात भावनांना जागा नाही. (“Feelings have no place in practical
life.”)
खोटं बोलणारी लोकं हि पाहिलीत. अपेक्षित
लोकांकडून अनपेक्षित गोष्टी घडताना पाहील्यात. कधीही खोटे न बोलणारे लोकंही खोट बोलायला लागलेत. त्याचाच जास्त त्रास झाला.
त्यामुळे मी संवाद हि सोडलाय. फोन उचलणे हि सोडून दिलेत. आणि फोन करणे तर दूरच.
आश्वासनांपलीकडे काही मिळालं नाही. गरजेच्या वेळी
पाठ फिरवणारे लोक हि बघितलेत. पैसा माणसाला बदलवतो याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
शेवटी प्रश्न हि आपलेच आणि उत्तर हि आपल्यालाच शोधावं लागणार. खरं तर समोर येणारी
प्रश्न आणि त्यांचे उत्तर शोधण्यात आपलं जीवन खर्ची पडते. प्रश्न आणि उत्तर याचा
लपंडाव सुरु असताना आपण फक्त बघत राहतो.
गरजा मर्यादित करायला हव्यात. आयुष्यात नियोजन
हवं. अन्यथा प्रश्न पाठ सोडणार नाहीत. एवढं जरी शक्य झालं तरी अनेक प्रश्न आपोआप
नाहीसे होतील. प्रयत्न तर करायला हवा. वाढत्या जबाबदार्या आपल्याला बंदिस्त आयुष्य
जगायला भाग पाडतात. मोकळेपणाने जगणे तर दूरच राहिलं. आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण
होण्याचं स्वप्नं तरी कागदावरच आहे. प्रत्यक्षात कधी येईल माहित नाही.
काळाच्या ओघात पूर्वीचे सगळी वाक्ये खोटे ठरायला लागलेत. जस कि A friend in need is a friend indeed,
Honesty is the best policy, Failure is the stepping stone to success. त्यात पुढीलप्रमाणे बदल केला तरी हरकत नाही... A friend in need is NEVER a
friend indeed, Honesty is the best policy, BUT NOT ALL THE TIME, and Failure
is NOT the stepping stone to success, FAILURE IS ALWAYS THE
FAILURE and the SUCCESS IS ALWAYS THE SUCCESS, because nobody can
understand what one loses when the success gets delayed.
काळ बदललाय...आपणही बदलायला हवे...नाहीतर WHO MOVED MY CHEESE? सारखी अवस्था होईल. नवीन वर्षाचं स्वागत करताना
भूतकाळापासून काही बोध घ्यायचा आहे आणि पुष्कळ गोष्टींची पुनरावृत्ती टाळायची आहे.
जीवनाच्या लपंडावात एक प्यादा न होता सूत्रधार व्हायचं आहे. ध्येय तर तेच आहे.
अपेक्षा आणि अपेक्षाभंग, स्वप्नं आणि स्वप्नपूर्ती, आशा आणि निराशा या सर्व चक्रांमधून
स्वतःला बाहेर काढायचं आहे. त्यात कितपत यश मिळेल ते येणारा काळ आणि परिस्थिती च
ठरवेल. तसंही आता या सगळ्या गोष्टींची सवय झालीय. अंगवळणी पडलंय सगळं.
नवीन वर्षाच्या जुन्या शुभेच्छा !!!
सचिन भगत