व्यक्तिमत्त्व विकास…आताच्या काळातील परवलीचा शब्द. बदलत्या शिक्षण
पद्धतीत सुद्धा व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्यात आला आहे.
व्यक्तिमत्त्व आणि विकास या दोन संकल्पना आपल्याला समजून घेणे
गरजेचे आहे.
व्यक्तिमत्त्व म्हणजे
नेमकं काय?:
आपण जसं दिसतो ते
व्यक्तिमत्त्व की आपल्या आत आहे ते की अजून काही. वयाने वाढलो किंवा शरीराने वाढलो
किंवा चांगले कपडे घातले म्हणजे व्यक्तिमत्व विकास झाला का? याचं उत्तर नाही असंच
आहे.
आपण जसं वयाने वाढत जातो
तसे आपल्यात मानसिक, शारीरिक, बौद्धिक, भावनात्मक बदल होत जातात. आपल्या आसपास असलेया प्रत्येक
गोष्टीचा, जसे की कुटुंब, शेजारी, मित्र, शाळेतील वातावरण, आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम
होत असतो.
काही लोकं रागीट असतात तर
काही प्रेमळ असतात. काही फटकळ असतात तर काही प्रेमाने संवाद साधतात. आपण जसं
समाजात वावरतो, जसा संवाद साधतो त्यावर आपलं व्यक्तिमत्व ठरत असते. आपली समाजातील
प्रतिमा ठरत असते. आणि चांगली प्रतिमा असणे कधीही फायद्याचीच.
थोडक्यात काय तर आपला
सर्वांगीण विकास म्हणजे व्यक्तिमत्व विकास. मग तो मानसिक, शारीरिक, बौद्धिक किंवा
आपल्या शी संबंधित सर्व काही. चार-चौघात, समाजात राहायचं अथवा नोकरी करायची तर
इतरांची जुळवून घेणे ही महत्वाचे. त्यासाठी व्यक्तिमत्व विकास गरजेचा.
व्यक्तिमत्व विकास करायचा
तर खालील बाबी अंमलात आणाव्या लागतील:
•उत्कृष्ट संभाषण कौशल्य
/ संवाद साधण्याची कला
•चेहऱ्यावर स्मित हास्य
ठेवून ग्रीट करणे.
•इतरांची मते ऐकून
घेण्याची क्षमता असणे.
•निर्णय क्षमता असणे.
•अचानक उद्भवलेल्या
प्रसंगाला घाबरून न जाता संयमाने सामोरे जाणे.
•रागावर नियंत्रण ठेवणे.
•चांगल्या सवयी अंगी
बाळगणे
•संवाद साधने
•संयम बाळगणे
•आत्मविश्वास असणे
•सकारात्मक विचार करणे
•सतत कार्यक्षम राहणे
•उत्साही असणे
•प्रसंगावधान बाळगणे
•टिम वर्क
•ठरवून दिलेल्या वेळेत
काम करणे.
•वेळेचं महत्त्व जाणणे
•इतरांच्या चुकांपासून
शिकणे
•नियमित व्यायाम/योगा
करणे
•निटनेटके
राहणीमान/पेहराव
या सर्व गोष्टी जन्माने
मिळत नाही. जन्माने मिळते ते शरीर. नैसर्गिक रित्या त्याची वाढ होत असते. त्या बरोबर
आपल्याला ही कौशल्ये आत्मसात करावी लागतात. शिकावी लागतात. मोठ-मोठ्या लोकांची
चरित्रे/आत्मचरित्रे वाचून स्वतःमध्ये बदल घडवून आणता येऊ शकतो. सार्या गोष्टी एका
वेळी आत्मसात केल्या जाऊ शकत नाही. हळू-हळू त्या शिकाव्या लागतात. व्यक्तिमत्व विकास
झालेले व्यक्ती यशस्वी झालेले दिसतात. कारण त्यांना लोकांना समजून घेण्याची,
त्यांचे प्रश्न समजून घेण्याची कला अवगत झालेली असते.
सचिन भगत
(९९२२१२७३८५)
श्री संत गजानन
महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव
No comments:
Post a Comment