Friday, October 11, 2019

लहानपण देगा देवा


कानावर पडलेला एक संवाद:-  स्थळ: रेल्वे स्टेशन
वडील: हे  बघ, ट्रेन जातेय.
लहान मुलगा: ट्रेन...मग ती कुठे जाते?
वडील: सगळीकडे....
लहान मुलगा: सगळीकडे कुठं?
वडील: मुंबई, नागपूर, दिल्ली अशी सगळीकडे.
लहान मुलगा: मग या दुसर्या ट्रेन ला काय झालं?
वडील: ती थांबलीय....गुड्स ट्रेन आहे ती.
लहान मुलगा: मग तिला काय झालं?
वडील: काहीच नाही.
लहान मुलगा: मग त्यात कोण जाते?
वडील: आपण नसतो जात त्यात. सामान ने ने-आण करतात.
लहान मुलगा: कोणते सामान...
वडील: सगळं...आपल्याला जे जे लागते ते गुड्स ट्रेन ने येते. तुला सायकल घेतली ना,,,ती पण गुड्स ट्रेन मध्ये आली होती.
लहान मुलगा: मग आपण पण  जाऊ ट्रेन गुड्स ट्रेन मध्ये...
वडील: आपण नसतो जात त्यात . आपण पसेंजर ट्रेन मध्ये जातो.
लहान मुलगा: मग पसेंजर ट्रेन मध्ये कोण असते?
वडील: लोकं असतात. ते प्रवास करतात.
लहान मुलगा:  आपली ट्रेन आहे ही?
वडील: नाही.
लहान मुलगा: मग कुणाची आहे?
वडील: ती गव्हर्नमेंट ची असते.
लहान मुलगा: मग गव्हर्नमेंट कुठे राहते?
वडील: अरे बाबू, गव्हर्नमेंट एक संस्था असते.
लहान मुलगा:  मग गव्हर्नमेंट बोलते का आपल्याशी?
वडील: नाही.
लहान मुलगा:  मग आपल्याशी का बोलत नाही?
वडील: ती बोलत नाही.
लहान मुलगा: मग आपण रोड वर आणू ट्रेन ला.
वडील:ती रोड वर नाही येत.
लहान मुलगा: मग ती कशी चालते.
वडील: ती track वर चालते. चल आता आपण घरी जाऊ.
...................................................................................................................................................................................

 ...................................................................................................................................................................................


सचिन भगत  (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव

Thursday, October 10, 2019

व्लोगिंग (Vlogging) म्हणजे काय?


व्लोग (Vlog)...अलीकडे प्रचलित झालेला शब्द. आपल्यापैकी कित्येकांना माहित नाही.
व्लोग ची व्याख्या अशी:
“a video blog: a record of your thoughts, opinions, or experiences that you film and publish on the internet.” (https://dictionary.cambridge.org/dictionary/english/vlog)

थोडक्यात व्हिडीओ ब्लॉग (Video Blog). वेब टेलेव्हिजन (Web Television) चा एक प्रकार. व्हिडीओ च्या माध्यमातून जाहिरात करणे, माहिती पोचवणे, जागरुकता निर्माण करणे, मनोरंजन करणे ई. पूर्वी ब्लॉगिंग ला सपोर्ट म्हणून व्हिडीओ जोडले जायचे. आता मात्र व्लोगिंग एक स्वतंत्र क्षेत्र निर्माण झालंय.
साधारणतः २००५ नंतर व्लोगिंग मध्ये प्रचंड वाढ झाली. यु ट्यूब हे व्लोगिंग लोकप्रिय माध्यम. एक प्रकारची मोनोपोली आहे यु ट्यूब ची.
पूर्वी सोशल नेट्वर्किंग ला फक्त लिखित माहिती, फोटो, कधी कधी व्हिडीओ असायचे.  फेसबुक वर नाही का आजकाल व्हिडीओ अपलोड करणे सुरुय. दृक-श्राव्य आपल्याला जास्त भावते. कारण लिखाणातून व्हिजुअल्स, भाव दाखवता येत नाही. त्यामुळे वाचक ते गंभीरतेने कदाचित घेणार नाही. त्यामुळे व्हिडीओ अपलोड करण्यावर भर दिसतोय. न्यूज चनेल चं उदाहरण घ्या. त्यांनी किती व्हिडीओ अपलोड केलेले असतात.  सोशल नेट्वर्किंग (फेसबुक, ट्विटर, इंस्ताग्राम, whatsapp) वर आजकाल व्हिडीओ जास्त फोरवर्ड केले जात आहे.
स्मार्ट फोन सामन्यांच्या हाती पडला; त्यात जिओ ने इंटरनेट डेटा सहज उपलब्ध करून दिला आणि यु ट्यूब वापरणार्यांची संख्या प्रचंड वाढली.

आजकाल प्रत्येक जण आपला वेळ मोबाईल वापरण्यात घालवतो.  शहरी-भागापुरत ते मर्यादित न राहता ग्रामीण भागात ही विस्तारलं आहे. हिच संधी व्लोगर्स नी टिपली.
कित्येक व्लोगर सक्रीय आहेत यु ट्यूब वर. एखादा नवीन स्मार्ट फोन बाजारात आला की त्याचे reviews सहज उपलब्ध होतात. म्हणजे काय कुठलाही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस बद्दल माहिती  व्हिडीओ च्या माध्यमातून.  ग्राहकांना येणाऱ्या समस्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करतात व्लोगर्स. तुम्ही काही पण टाईप करा. असंख्य व्हिडीओ दिसतात.
फायदे:
•भेट देणार्याची संख्या वाढते
•अपिलिंग
•जाहिरातीसाठी उत्तम माध्यम , product  किंवा service चांगल्या प्रकारे दाखवता येते
•खिळवून ठेवते 
•आत्मविश्वास वाढतो
•बोलताना वाटणारी भीती नाहीशी होते.

व्लोगिंग मध्ये वेगळं पण चांगलं करिअर घडवता येऊ शकते. फक्त content दमदार पाहिजे. तसंही आपण म्हणतोच की Content is the king. हे एका रात्रीत होत नाही.  वेळ लागतो. मेहनत लागते.
यु ट्यूब वर स्वतःच चनेल सुरु करून आपण अमर्यादित व्हिडीओ अपलोड करू शकतो. ते ही कुठलीही फी न भरता. मोफत आहे. यु ट्यूब Video Hosting निशुल्क पुरवते.
छोटे-छोटे व्हिडीओ तयार करून नियमित पणे अपलोड करायला सुरुवात करायला हरकत नाही. आपल्याकडे काय हवं तर एक व्हिडीओ कॅमेरा, इन्टरनेट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कल्पना. बघणाऱ्यांची संख्या जशी जशी वाढत जाईल तसं तसं कमावण्याचा एक मार्ग उपलब्ध होऊ शकतो.
काळ झपाट्याने बदलतोय. प्रत्येक क्षेत्रात आमुलाग्र बदल होत आहेत. काळानुसार चालायचं तर नव-नवीन गोष्टी शिकायला हव्यात.

सचिन भगत  (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव

Wednesday, October 9, 2019

ब्लॉग म्हणजे काय?


दिवसेंदिवस ब्लॉगिंग ची क्रेझ वाढतेय. पण नक्की ब्लॉगिंग ची सुरुवात कधी झाली असेल. असा प्रश्न कित्येकांना पडला असेल.
सुरुवातीला वेबलॉग (Weblog) ही टर्म Jorn Barger या व्यक्तीने प्रचलित केली. त्यानंतर ब्लॉग हा शब्द त्याचा शोर्ट फॉर्म Peter Merholz या व्यक्तीने प्रचलित केला नव्वद च्या दशकात.
गुगल सर्च  केलं तर कित्येक व्याख्या मिळतात ब्लॉग च्या. त्यापैकी काही:
“a website that contains online personal reflections, comments, and often hyperlinks, videos, and photographs provided by the writer.” (https://www.merriam-webster.com/dictionary/blog)
“a regularly updated website or web page, typically one run by an individual or small group, that is written in an informal or conversational style.” (Oxford Dictionary)
जो ब्लॉग लिहितो तो ब्लॉगर आणि ती लिहिण्याची प्रक्रिया म्हणजे ब्लॉगिंग.
जो तो आपल्या परीने ब्लॉग ची व्याख्या करू शकतो. ते एक वेब पेज किंवा काही लोकांसाठी ते व्यक्त होण्याचं माध्यम, माहिती पोचवण्याच माध्यम, कंपन्यांसाठी मार्केटिंग, प्रमोशन वगैरे. आज असंख्य लोकं ब्लॉगिंग मध्ये सक्रीय आहेत. ते वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करतात. पर्यटन, आरोग्य, शैक्षणिक, मनोरंजन, फूड, फिल्म, साहित्य, कथा, कविता असे अनेक विषय.
ब्लॉग तयार करणे तसं सोपंच. बिनाखर्चिक काम. त्याला काही पैसे मोजावे लागत नाहीत. लिखाणाची आवड असावी फक्त. पूर्वी डायरी लिहायचे लोकं. पण ती आपल्या पर्यंत मर्यादित असायची. ब्लॉग च्या माध्यमातून आपले आचार-विचार लोकांपर्यंत सहज पोचवता येतात. व्यक्त होण्याचं आधुनिक टूल म्हटलं तरी हरकत नाही.
अनेक ब्लॉग होस्टिंग साईटस आहेत. गुगल ब्लॉगस्पॉट ब्लॉगर, वर्डप्रेस हे वापर करणारे अधिक. थोडा-बहुत फरक आहे दोघांमध्ये.  डोमेन नेम घेऊन हवं तसं ब्लॉग ला नाव देता येते.
काळानुसार ब्लॉगिंग सुद्धा व्यावसायिक झालंय. आपल्या प्रोडक्ट ची जाहिरात करण्यासाठी कंपन्या ब्लॉगर ला पैसे देऊ लागल्या आहेत. गुंगल ने अडसेंस (Adsense) उपलब्ध करून दिलंय. थर्ड पार्टी अडस (Ads) सुद्धा मिळतात. पण हे पेज व्ह्यूज वर अवलंबून आहे. एखाद्याचा ब्लॉग जर खूप लोकं पाहत असतील तर त्याला ब्लॉग पैसे कमवण्याच माध्यम झालंय.

लिखाणाची आवड असेल तर ब्लॉग तयार करायला हरकत नाही. गुगल च्या ब्लॉगस्पॉट वर ब्लॉग तयार करणे प्रचंड सोपं आहे. त्यासाठी खालील स्टेप्स वापरा:
•जिमेल (Gmail) चं अकाउंट असणे गरजेचे आहे.
•blogger.com या साईट वर जाऊन Sign In करा. जिमेल अकाउंट चे युझरनेम आणि पासवर्ड वापरा.
•लॉग इन केल्यानंतर जो स्क्रिन येईल  त्याच्या  डाव्या बाजूला New Blog असं लिहिलेलं दिसेल. त्यावर  क्‍लिक करा.
•त्यानंतर ब्लॉगचे टायटल, ब्लॉगचा पत्ता आणि ब्लॉगची डिझाइन या तीन बाबी भरायच्या.
•शेवटी क्रिएट ब्लॉग (Create Blog)वर क्लिक केलं की ब्लॉग तयार.
एकदा का ब्लॉग तयार झाला की आपल्याला सेटिंग, ले ओउट, थीम बदलता येते. Gadgets पण समाविष्ट करता येतात. ब्लॉग बद्दल थोडी माहिती देता येते.
जसा जसा आपला वापर वाढत जाईल तसे तसे अनेक features आपल्याला लक्षात येत जातील.
ब्लॉग का तयार करावा:
•लिहिण्याची आवड असेल तर
•आपली मते लोकापर्यंत पोचवायची असतील तर
•कथा/कविता लिहित असाल तर
•स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर
•लिखाणाचे कौशल्य वृद्धिंगत करायचे असेल तर

सचिन भगत  (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव