दिवसेंदिवस ब्लॉगिंग ची क्रेझ वाढतेय. पण नक्की
ब्लॉगिंग ची सुरुवात कधी झाली असेल. असा प्रश्न कित्येकांना पडला असेल.
सुरुवातीला वेबलॉग (Weblog) ही टर्म Jorn Barger या व्यक्तीने प्रचलित
केली. त्यानंतर ब्लॉग हा शब्द त्याचा शोर्ट फॉर्म Peter Merholz या व्यक्तीने प्रचलित
केला नव्वद च्या दशकात.
गुगल सर्च केलं तर कित्येक व्याख्या मिळतात ब्लॉग च्या.
त्यापैकी काही:
“a website that contains online personal reflections,
comments, and often hyperlinks, videos, and photographs provided by the writer.” (https://www.merriam-webster.com/dictionary/blog)
“a regularly updated website or web page, typically one
run by an individual or small group, that is written in an informal or
conversational style.”
(Oxford Dictionary)
जो ब्लॉग लिहितो तो ब्लॉगर आणि ती लिहिण्याची
प्रक्रिया म्हणजे ब्लॉगिंग.
जो तो आपल्या परीने ब्लॉग ची व्याख्या करू
शकतो. ते एक वेब पेज किंवा काही लोकांसाठी ते व्यक्त होण्याचं माध्यम, माहिती
पोचवण्याच माध्यम, कंपन्यांसाठी मार्केटिंग, प्रमोशन वगैरे. आज असंख्य लोकं
ब्लॉगिंग मध्ये सक्रीय आहेत. ते वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करतात. पर्यटन, आरोग्य,
शैक्षणिक, मनोरंजन, फूड, फिल्म, साहित्य, कथा, कविता असे अनेक विषय.
ब्लॉग तयार करणे तसं सोपंच. बिनाखर्चिक काम.
त्याला काही पैसे मोजावे लागत नाहीत. लिखाणाची आवड असावी फक्त. पूर्वी डायरी
लिहायचे लोकं. पण ती आपल्या पर्यंत मर्यादित असायची. ब्लॉग च्या माध्यमातून आपले
आचार-विचार लोकांपर्यंत सहज पोचवता येतात. व्यक्त होण्याचं आधुनिक टूल म्हटलं तरी
हरकत नाही.
अनेक ब्लॉग होस्टिंग साईटस आहेत. गुगल ब्लॉगस्पॉट
ब्लॉगर, वर्डप्रेस हे वापर करणारे अधिक. थोडा-बहुत फरक आहे दोघांमध्ये. डोमेन नेम घेऊन हवं तसं ब्लॉग ला नाव देता येते.
काळानुसार ब्लॉगिंग सुद्धा व्यावसायिक झालंय.
आपल्या प्रोडक्ट ची जाहिरात करण्यासाठी कंपन्या ब्लॉगर ला पैसे देऊ लागल्या आहेत.
गुंगल ने अडसेंस (Adsense) उपलब्ध करून दिलंय. थर्ड पार्टी अडस (Ads) सुद्धा मिळतात. पण हे पेज व्ह्यूज वर अवलंबून
आहे. एखाद्याचा ब्लॉग जर खूप लोकं पाहत असतील तर त्याला ब्लॉग पैसे कमवण्याच
माध्यम झालंय.
लिखाणाची आवड असेल तर ब्लॉग तयार करायला हरकत
नाही. गुगल च्या ब्लॉगस्पॉट वर ब्लॉग तयार करणे प्रचंड सोपं आहे. त्यासाठी खालील
स्टेप्स वापरा:
•जिमेल (Gmail) चं अकाउंट असणे गरजेचे
आहे.
•blogger.com या साईट वर जाऊन Sign In करा. जिमेल अकाउंट चे युझरनेम आणि पासवर्ड वापरा.
•लॉग इन केल्यानंतर जो स्क्रिन येईल त्याच्या
डाव्या बाजूला New Blog असं लिहिलेलं दिसेल.
त्यावर क्लिक करा.
•त्यानंतर ब्लॉगचे टायटल, ब्लॉगचा पत्ता आणि ब्लॉगची डिझाइन या तीन बाबी
भरायच्या.
•शेवटी क्रिएट ब्लॉग (Create Blog)वर क्लिक केलं की ब्लॉग तयार.
एकदा का ब्लॉग तयार झाला की आपल्याला सेटिंग,
ले ओउट, थीम बदलता येते. Gadgets पण समाविष्ट करता येतात.
ब्लॉग बद्दल थोडी माहिती देता येते.
जसा जसा आपला वापर वाढत जाईल तसे तसे अनेक features आपल्याला लक्षात येत जातील.
ब्लॉग का तयार करावा:
•लिहिण्याची आवड असेल तर
•आपली मते लोकापर्यंत पोचवायची असतील तर
•कथा/कविता लिहित असाल तर
•स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर
•लिखाणाचे कौशल्य वृद्धिंगत करायचे असेल तर
सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव
No comments:
Post a Comment