तंत्रज्ञानाचा
जसा जसा वापर वाढतोय तसं तसं नवीन काहीतरी मार्केट मध्ये आणलं जातेय. शिक्षक आणि
विद्यार्थी यांच्यात अधिक संवाद व्हावा, ते जोडले जावे म्हणून गुगल ने गुगल
क्लासरूम निर्माण केलं. गुगल क्लासरूम फ्री वेब सर्विस आहे. त्याचा वापर करण्यासाठी
फक्त जीमेल अकाउंट हवंय. ॲप डाऊनलोड करून
आपल्याला त्याचा वापर करता येतो. आपण कुठंही असलो तर त्या माध्यमातून
विद्यार्थ्यांना असाइनमेंट देता येतात. व्हिडिओ, पिडीएफ फाइल्स गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करता येतात. सोबतीला फक्त इंटरनेट
हवं. पेपरलेस टिचिंग-लर्निग म्हणता गुगल क्लासरूम ला येईल.
गेल्या तीन
वर्षात १० मिलिअन पेक्षा जास्त वापरकर्ते गुगल क्लासरूम ला जोडले गेले आहेत. त्याचा वापर ही अतिशय सोपा
आहे. कुणीही ते सहज करू शकतो. तेच गुगल चं वैशिष्ट.
शिक्षक एकाच वेळी
अनेक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी असाइनमेंट शेअर करू शकतात. नोट्स शेअर करू शकतात.
तसेच प्रत्येकाला वेगवेगळी असाइनमेंट सुद्धा देता येते. गुगल कॅलेंडर इंटीग्रेट
करून डेडलाईन सेट करता येते. गुगल
क्लासरूम च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ई-मेल सुद्धा पाठवता येतात. एखादी असाइनमेंट
किंवा प्रोजेक्ट शेड्युल करता येतो. सेशन संपल्यावर अर्काईव्ह करून डेटा सेव्ह
करता येतो. असाइनमेंट/सूचना सेम असतील तर पुन्हा वापरता येतो तो डेटा. यात वेळेची
बचत होते. शिक्षकांना विद्यार्थ्यांचं ग्रेडिंग सुद्धा करता येते. विद्यार्थ्यांची
प्रगती पालकांना कळवण्याची सोय आहे.
गुगल क्लासरूम कसा
तयार करावा?
•प्ले स्टोरवरून 'गुगल क्लासरूम' हे ॲप डाऊनलोड करा.
•ॲप ओपन केल्यावर उजव्या बाजूला '+' या साईन वर क्लिक करून 'क्रिएट क्लास' या पर्यायावर टिक
करा.
•कटिन्यू
केल्यानंतर 'क्लास नेम' आणि 'सेक्शन' टाकून क्लास
क्रिएट करा.
•क्लासरूम क्रिएट
झाल्यानंतर उजव्या बाजूला वर असणाऱ्या सेटिंगच्या आयकॉनवर जाऊन शिक्षकांना, तयार केलेल्या गुगल
क्लासरूमचा कोड दिसून येईल.एकदा का शिक्षकाने क्लास क्रिएट केला की विद्यार्थ्यांना
जोडता येते. ती प्रक्रिया ही सोपी. शिक्षकाकडून मिळालेला कोड टाकून विद्यार्थी जोडले
जातात.
गुगल क्लासरूम मुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवाद वाढीस
मदत होते. तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगत होतेय. आपल्याला ते शिकावं लागेल.
शिक्षकांनी गुगल क्लासरूम चा वापर करावयास
हरकत नाही.
सचिन भगत
(९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी
महाविद्यालय
शेगाव
No comments:
Post a Comment