गेल्या आठवड्यात अमेझॉन.इन (Amazon.in) वरून काही पुस्तके मागवली होती. चार-पाच दिवसात पुस्तके मिळालीही. मागवलेली
सर्व पुस्तके मिळाली असं मला वाटलं. दोन-तीन दिवसांनी सहज चं अमेझॉन.इन च्या ऑर्डर सेक्शन मध्ये गेलो तर लक्षात आलं की जेवढी पुस्तके मागवली त्यापैकी
एक पुस्तक मिसिंग आहे. ज्या बॉक्स मध्ये पुस्तके आली त्यात एक पुस्तक कमी होतं.
इकडे ते डिलिव्हरी (Delivery) झाली असं दाखवतेय. काहीतरी घोळ झाला.
कस्टमर केअर ला संपर्क साधला. अमेझॉन.इन च्या
साईटवर Customer Help ला क्लिक केलं. तिथे दोन पर्याय आहेत. Chat Right Now किंवा Have us call you. मी Chat Right Now हा पर्याय निवडला. दुसरी विंडो ओपन झाली आणि माझा प्रोब्लेम मी
सांगितला. झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी
व्यक्त करून आमचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल असं सांगण्यात आलं.
काही क्षणात त्यांच्या प्रतिनिधीने माझ्याशी
फोन करून संपर्क साधला. पुन्हा एकदा माहिती जाणून घेतली. त्यांनी कोणतेही आढेवेढे
न घेता येत्या दोन-तीन दिवसात (Business Days) रिफंड (Refund) करतो असं सांगितलं आणि
त्यांनी दुसर्या दिवशी ती रक्कम रिफंड केली. सारं काही तत्काळ.
नेमका घोळ कसा झाला? सेलर तर असे करत नसतील?
माझ्या लक्षात आलं नसतं तर फसवल्या गेलो असतो.
अमेझॉन ने फार काही खोलात न जाता रक्कम केली. मला खरंच ते
मिळालं नाही याची शहानिशा केली नाही. मी सांगतोय ते खरं समजून तो सोडवण्याचा
प्रयत्न केला ताबडतोब.
ग्राहक...”कस्टमर इज द किंग म्हटलं जातं” ते
यासाठीच (Customer is the king).
दोष कुठे असेल ते शोधतील ही कदाचित ...पण आता
आपल्याला जोडलेला ग्राहक दूर जायला नको. त्याचा विश्वास कायम राहायला हवा आणि
त्यामुळे ग्राहकाच्या समस्यांचं समाधान करणे याला सगळ्यात जास्त महत्व. ज्याला हे
समजलं तो व्यवसायात पुढे जातो. मग कितीही स्पर्धा असो.
ऑनलाईन खरेदी करताना अनेक अनुभव येतात. कित्येकदा
फसवणूक ही होते.
माझ्या परिचयातल्या एका व्यक्तीला ला एकदा फोन आला की
तुम्हाला अमुक –तमुक कंपनीचा मोबाईल केवळ ३९९९/- मध्ये मिळतोय ज्याची बाजारात
किंमत अकरा हजाराच्या जवळपास आहे. त्या
व्यक्तीने होकार दिला. चार-पाच दिवसांनी पार्सल आलं. पे ओन डिलिव्हरी. पैसे दिले.
उघडून पाहिलं तर त्यात बेल्ट आणि एक चष्मा निघाला. ज्या नंबर वरून फोन आला त्यावर
फोन करायला गेले तर नंबर अस्तित्वात नाही. कुठे जाणार? सोडून द्यावं लागलं. आपल्यापैकी
अनेकांना असा गंडा घातला गेलाय.
ऑनलाईन खरेदी करण्यार्यांचे प्रमाण प्रचंड वाढलंय.
शहरी भागापासून ते ग्रामीण पर्यंत. आज-काल प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहेच. त्यामुळे
Browsing सोपं झालंय. जसे व्यापार करणारे सरसावले तसेच फसवणूक करणारे
ही.
ऑनलाईन (Online Shopping) खरेदी करताना वस्तू जशी
दिसते तशी असतेच असंही नाही. दुकानात जाऊन वस्तू खरेदी करताना आपण ती वस्तू प्रत्यक्ष
हातात घेऊन त्या वस्तूच्या गुणवत्ते बाबत (Quality) तपासणी करत असतो. ऑनलाईन खरेदी करताना हा पर्याय नसतोच. एखादी
वस्तू ऑनलाइन जरी आकर्षक वाटत असली, तरी प्रत्यक्षात ती तशी
असेलच असे नाही. कित्येकदा damaged products मिळतात. किमती नेहमी बदलत असतात. खरी किमत
कुठली हे आपल्यालाही समजत नाही. एवढी ऑफर (Offer) तेवढी ऑफर. हा सेल तो
सेल वर्षभर सुरूच असतो की. त्यामुळे वस्तू विकत घेताना चांगल्या आणि नावाजलेल्या
वेबसाइट्सवरूनच घ्यायला हव्या. अनेक ई कॉमर्स पोर्टल्स (E Commerce)आहेत.
कित्येक फेक वेबसाईटस आहेत. आपल्याकडे फारशी
जागरुकता नाहीच. त्यामुळे सहज फसवणूक लवकर होते. कधी कधी आपल्यापैकी कित्येक जण whats app वर लिंक पाठवतात. त्या मुळात फेक असतात. असो.
सचिन भगत
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव