Thursday, September 26, 2019

मुलाखत तंत्र (Interview Techniques)


आजकाल कित्येकांना जॉब साठी मुलाखतीला सामोरे जावं लागते. पण मुलाखतीची तयारी कशी करावी हेच कित्येकांना माहित नाही. डिग्री मिळाली म्हणजे नोकरी मिळेल याची खात्री नाही. अलीकडच्या काळात मुलाखतीला महत्त्व प्राप्त झालंय. मुलाखत चांगली झाली तर नोकरी पक्की.
मुलाखत म्हणजे गुणवत्तेच, कौशल्याचं मूल्यमापन. त्यात आपल्या संबंधित प्रत्येक गोष्टीची पडताळणी केली जाते. यात आपलं व्यक्तिमत्त्व कसं आहे, दृष्टीकोन कसा आहे, नेतृत्वगुण, सांघिक काम करण्याची क्षमता,ज्ञान यांची पडताळणी होते.  आपण या पोस्ट साठी किती लायक आहे हे पटवून देणे यात आपण किती यशस्वी होतो त्यावर आपला जॉब अवलंबून. आपण आपल्या कौशल्यांच कसं मार्केटिंग करतो, कशी जाहिरात करतो ते आपल्यावर अवलंबून. प्रत्येकाला मुलाखतीची भीती असते. परंतु आपण योग्य तयारी करून गेलो तर अडचण येत नाही.
मुलाखतीची (Interview) तयारी कशी करावी? काय गरजेचं आहे, काय नाही त्याबद्दल थोडक्यात:
सर्वप्रथम ज्या कंपनीच्या मुलाखतीला जातोय त्या कंपनीबद्दल संपूर्ण माहिती गोळा करायला हवी.
रेझुमे ( Resume’) तयार करावा. तो गुगल वरून डाऊनलोड करून एडिटिंग करू नये.
रेझुमे मध्ये लिहिलेल्या/उल्लेख केलेल्या प्रत्येक गोष्टीच स्पष्टीकरण आपल्या कडे असणे गरजेचे आहे.
आपली कौशल्ये त्यांना कशी उपयोगी पडतील याचा कयास लावणे आणि त्याला अनुसरून उत्तरे देणे.
संभाषण कौशल्य चांगले पाहिजे.
भाषेवर प्रभुत्व असायला हवं. (Language Proficiency)
नेहमी विचारलेले जाणार्या प्रश्नाची (Frequently Asked Questions) उत्तरे तयार करून ठेवावी.
मुलाखती दरम्यान प्रामाणिक राहणे.
प्रश्न संपूर्ण ऐकून, समजून घेणे आणि नंतर उत्तर देणे.
बोलण्यात तार्किकता, सुसंगता, स्पष्टता असावी.
आपल्या क्षेत्राचं आवश्यक ज्ञान आपल्याला हवं.
मुलाखतीच्या दिवशी वेळेआधी पोचणे.
देहबोली, हाव-भाव, भावमुद्रा यांचा योग्य वापर करावा
एखादा प्रश्न समजला नाही किंवा ऐकू आला नाही तर Pardon sir/madam असं म्हणावं.  शिष्टाचार पाळावा.
एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसल्यास Sorry Sir/Madam असं म्हणावं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला येईल असं नाही. त्यामुळे घाबरून जायची गरज नाही. 
स्वतःवर आत्मविश्वास असला पाहिजे.
पेहराव चांगला असायला हवा.
अतिआत्मविश्वास बाळगू नये.
अतिशयोक्ती टाळावी.

प्रत्येकाला मुलाखत देण्याचा प्रसंग येतोच. त्यामुळे घाबरून न जाता व्यवस्थित तयारी करावी. तयारी चांगली असेल तर आपल्याला आत्मविश्वासाने उत्तरे देता येतील. अभियांत्रिकी, व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे या सर्वाना मुलाखतीला सामोरे जावं लागत. प्रभावीपणे मांडणी / सादरीकरण कसं  करता येईल याचा सराव करावा. बहुतेक मुलाखती इंग्रजी भाषेतच होतात. त्यामुळे ती शिकून घ्यायला हवी. सरावाने ती शिकता येते.
थोडक्यात काय मुलाखत हे एक तंत्र आहे, कला आहे.  ती आपण अवगत करायलाच हवी. स्पर्धेच्या या युगात टिकायचं असेल तर आवश्यक गोष्टींची पूर्तता करायलाच हवी.

सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव

No comments:

Post a Comment