Tuesday, February 18, 2020

नेमकं ८


शिक्षण...परवलीचा शब्द. काळाच्या ओघात त्याचं महत्त्व सर्वांच्या लक्षात आलंय. त्यामळे ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत त्याकडे कल प्रचंड वाढलाय. सर्वच स्तरातील लोकं आपल्या पाल्यांना शिक्षण देण्यात पुढाकार घेत आहे. सध्याच्या स्थितीत शिक्षण म्हटलं शाळा, माध्यम आणि नंतर बोर्ड याची चोईस आहे.
काल एक जण भेटला होता. अनौपचारिक गप्पा करताना म्हटला तुझा मुलगा शाळेत जातो का?
मी म्हटलं, हो, नर्सरीत जातो.
सि.बि.एस.ई. का? तो म्हटला.
नाही...स्टेट बोर्ड. मी सांगितलं.
तो उत्तरला-सि.बि.एस.ई. ला टाकायला पाहिजे होतं ना. त्यांचा syllabus अडव्हांस असतो.
मी म्हटलं फार काही फरक पडत नाही. मी झेड पि ला होतो. पहिली ते चौथी एक शिक्षक होते. जे शिकवलं ते अजूनही आठवते. सि.बि.एस.ई असो का स्टेट बोर्ड काय शिकवलं जाते त्यापेक्षा कसं शिकवलं जातं ते महत्त्वाचे. Board/school doesn’t matter.
मी ऐकू शकत नाही असं दिसल्यावर त्याने तो विषय सोडून दिला. त्याचं काही चूक होतं असं मी म्हणणार नाही कारण सगळीकडे इंग्रजी माध्यम आणि उपलब्ध असेल तर सि.बि.एस.ई. बोर्ड ही  मानसिकता झालीय. त्यांच्या दृष्टीने स्टेट बोर्ड म्हणजे मागासलेलं. त्यामुळे सि.बि.एस.ई. चं पिक जोमात आहे. काही वर्ष चालेल. अजून कुठलं तरी बोर्ड येईल. मग त्याची हवा. आपण त्यात वाहत जातो. अव्वाच्या सव्वा फी भरायला तयार. सि.बि.एस.ई. ची फक्त  नर्सरी ची पुस्तके घेतली तर अडीच-तीन हजाराच्या घरात. असं साधारण चित्र आहे.  बोर्ड कुठलंही असो, शाळा कोणतीही असो. जोपर्यंत आपण काही करत नाही. काहीच होत नाही.
सि.बि.एस.ई. शाळा सर्व खाजगी. तिथे शिकवणारे कसे आहेत याच्या खोलात गेलं तर वास्तव लक्षात येईल. अत्यंत कमी पैशात हे खाजगी शाळा मालक कामे करवून घेतात. गुणवत्ता काही नामवंत शाळा सोडल्या तर कुठं आहे? शेत चांगलं असून चालत नाही. त्याची तशी मशागत व्हायला पाहिजे. तसंच शिक्षणाचं. पण कोण सांगेल? जिकडे प्रवाह तिकडे सारे.
झेड पि. शाळा म्हणजे कमकुवत दर्जा चे शिक्षण असं चित्र आजकाल निर्माण झालंय. आणि सी.बी.एस.ई, आय.सी.एस.ई म्हणजे शिक्षणाचा दर्जा उत्तम. त्यामुळे शिक्षणाचा बाजार सुरू झाला आहे.
मुलांना चांगल्या  शाळेत घालण्यासाठी प्रत्येक पालक धडपडतो. जे आपल्याला मिळालं नाही ते मुलांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. हिच शिक्षण सम्राटांसाठी संधी आणि त्यांनी ते हेरली पण. आज शहरी भागापासून खेड्यापाड्या पर्यंत  इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा सुळसुळाट झालाय. त्यात वेगवेगळ्या बोर्डांची भर.
कित्येक पालकांना आवाक्यात नसताना सुद्धा या शाळांबद्दल ओढ आहे.  चांगलं बोर्ड आणि महागडी शाळा म्हटलं की दर्जा चांगला ही भावना निर्माण झालीय.
भली मोठी इमारत बांधायची, स्वच्छता गृह सारख्या पूरक सुविधा आणि प्रोजेक्टर किंवा डिजीटल बोर्ड, कॅमेरे लावले की लोकं आपोआप येतात.  तिच त्यांची खरी जाहिरात. शिक्षकांचा दर्जा, त्याचं शिक्षण किंवा शिकवण्याची पद्धत याकडे कुणी लक्ष घालत नाही.
एके काळी संस्कारांचं केंद्र असलेलं प्राथमिक शिक्षण आता व्यवसायाचं केंद्र बनलंय. आपण सगळेच याला कारणीभूत. आपण बदललो आहे त्यामुळे शिक्षण सम्राटांना फावलंय.
छळी लागे छम छम, विद्या येई घम घम असं पूर्वी म्हटलं जायचं. आज शिक्षक मुलांना हात ही लावू शकत नाही. तसं केलं तर पालक दुसर्या दिवशी शाळेत हजर असतात.
झेड.पि. शाळांची अवस्था दयनीय आहे. त्याला कारणीभूत सरकारी उदासिनता. बरं जे सत्तेत त्यांचाच खाजगी शाळा. त्यामुळे त्यांनी ही अवस्था जाणूनबुजून होऊ दिली. राजकारण्यांनी शिक्षणाचा खेळखंडोबा केलाय.  आज झेड.पि. शाळा शेवटच्या घटका मोजत आहे. विद्यार्थी मिळत नाहीत. सुरु असलेले वर्ग बंद पडत आहेत. शिक्षकांचं समायोजन केलं जातंय.
शिक्षणसम्राट निर्माण झालेत गेल्या काही वर्षात. त्यांनी शिक्षण हा व्यवसाय/ व्यापार करून टाकलाय.  आज हे शिक्षणसम्राट सर्व जनतेला वेठीस धरत आहेत. भरमसाठ फी , डोनेशनच्या नावाखाली हे लोकं जनतेला लूटत आहेत. नर्सरी पासून केजी ते पीजी पर्यंत यांचा धंदा जोरात सुरु आहे. कित्येकांना त्यांचे डोनेशन परवडणारे नाही.  अशीच परिस्थिती राहिली तर शिक्षण फक्त श्रीमंतांचीच मक्तेदारी होईल. आपल्या हे लक्षात येत नाही. अजून काही काळ येणार नाही.

खरं पाहिलं तर बाहेरून जे दिसते त्याला बळी न पडता शाळेतील शिक्षण पद्धतीचा दर्जा बघायला हवा. चांगल्या इमारती असल्या म्हणजे चांगलं शिक्षण असेलच असं नाही.
न संपणारा विषय आहे. तूर्तास एवढंच.

सचिन भगत (9922127385)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव

Wednesday, February 12, 2020

नेमकं ७

एका whats app ग्रुप मध्ये होतो. मी सहसा कुठली पोस्ट टाकत नाही. फोरवर्ड तर कधीच नाही. फक्त आलेल्या पोस्ट वाचायच्या. यापलीकडे काही नाही. त्या ग्रुप मध्ये बरेच सभासद होते. सर्व सुशिक्षित. त्यातले बहुतांशी सभासद एकाच विचारधारेचे. त्यामुळे पोस्ट ही तश्याच. तशी आमची कुठली विचारधारा नाही. कारण विचारधारेने पोट भरत नाही हे कधीच समजलेलं. जे चांगलं ते चांगलं. मानवते पलीकडे कुठली विचारधारा असू शकत नाही. दुर्दैवाने तसं होत नाही. त्या विशिष्ट विचारधारेच्या पोस्ट एक-दोन लोकांना काही पटत नव्हत्या. त्यांचे नेहमी वादविवाद चालायचे. सगळा ग्रुप तुटून पडत होता. म्हणजे वाद-विवाद ही virtual. मी फक्त वाचत होतो. न राहवून मी आधी त्या विचारधारेच्या समर्थन करणाऱ्या पोस्ट टाकू लागलो आणि  नंतर त्याच्या विरोधात. हे सगळं ठरवून केलं होतं. समर्थन करत होतो तो पर्यंत ठीक पण नंतर जेव्हा विरोध करू लागलो तर काही दिवसानंतर admin ने मला remove केलं. तसंही मला काही घेणं-देणं नव्हतं. मला चांगलं वाटलं. आणि admin ची कीव आली. ज्या विचारधारेचा तुम्ही स्विकार करता, प्रचार करता तिचा तुम्ही बचाव करू शकत नाही, चांगलं काय ते पटवून देऊ शकत नाही या पेक्षा फोलपणा काय असू शकतो. तसंही जगाच्या कुठल्याही कोपर्यात जा खरं ते खरं. त्याला  पटवून द्यायची गरज नसते. ते सर्वाना माहित असते.
लढा विचारांचा विचारांशी असला पाहिजे. तो वैयक्तिक असता कामा नये. कुणी आपल्या विचारधारेशी सहमत असेल असं नाही. पण आजकाल लोकांना ते जमत नाही.
आज-काल कुठेही जा. चहाची टपरी असो...सलून, नाश्ता सेंटर, बस स्टोप, मार्केट ला  किंवा अजून कुठेही लोकं विभागलेले आढळतात. नेमका हाच कसा चांगला हे सांगण्याची चढा-ओढ. इकडे तुम्हाला खायला नाही...हाल आहेत. कुणी येतंय का मदतीला. ज्याचं समर्थन करतात ते ओळखतात तरी का आपल्याला?
गेल्या ५-६ वर्षात हे प्रमाण प्रचंड वाढलंय.  ज्याला कवडीची अक्कल नाही तो ही तज्ञ झालाय. Whats app University मधून आलेले लेख वाचून ज्ञान समृद्ध झाल्याचा भास कित्येकांना. खरं-काय, खोटं-काय कुणाला माहित नाही. कित्येकदा आलेली माहिती ही जाणीवपूर्वक पसरवली गेलेली असते. काही लोकांना काम-धंदा नाही. ते फक्त forwarding करत असतात. आपण काय forward करतोय याचा कुणी विचार करत नाही.
विचारधारेच्या या गफलतीमुळे कित्येक लोकं एकमेकांपासून दूर जात आहेत. कटुता निर्माण होत आहे नाते-संबंधात. व्यक्ती मोठा की विचारधारा याचा ही विचार व्हायला पाहिजे. आपल्या जवळ असलेला व्यक्तीच वेळ प्रसंगी मदत करू शकतो. दुसरं कुणी येत नाही मदतीला.

व्यक्ती-व्यक्तींमध्ये दरी निर्माण करणारी कुठलीही विचारधारा कधी ही वैश्विक होऊ शकत नाही. लोकांना विभागणारी विचारधारा हवी की जोडणारी. ते आपण ठरवायचं. बाकी काही नाही. आपण सारे सुज्ञ.

सचिन भगत (9922127385)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव

Thursday, January 30, 2020

१०२ नेमकं ६...


इंग्रजी: भारतीय की परकीय?
इंग्रजी: भारतीय की परकीय? याचं उत्तर तसं परकीय. कारण हेच आपण शिकत आलोय. ब्रिटिशांनी ती भाषा भारतात आणली, रुजवली आणि ते गेल्यानंतर तीचा वापर वाढत गेला. ज्याला इंग्रजी येते त्याचा बोलबाला असं काहीसं चित्र या देशात निर्माण झालं. प्रत्येकाला ती भाषा शिकाविशी वाटली. इंग्रजी येत नाही म्हणून कमी पणाची भावना कित्येकांच्या मनात. पूर्वी पण तसं चित्र होतं आणि आजही आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि त्यांचा सुळसुळाट हे त्यातूनच आलं. गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत, गल्ली पासून दिल्ली पर्यंत  ती भाषा हवी-हवीशी वाटली. कुठल्याही शहरात जा इंग्रजी भाषा शिकवनारे क्लासेस दिसून येतील. Inferiority Complex प्रत्येकाला.  कित्येकदा तो भंडावून सोडतो. इंग्रजी येते म्हणजे भलतंच काही असा समज निर्माण झाला. आजकाल तर पालक आपल्या मुलांना देखील मातृभाषा सोडून इंग्रजी प्रथम शिकवण्याचा प्रयत्न करतात. सध्याची परिस्थिती अशी आहे की इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या कित्येक विद्यार्थ्यांना आपली मातृभाषा व्यवस्थित लिहिता-वाचता येत नाही. बर्याच अशी अवस्था होते की आपल्याला ना धड मातृभाषा येते ना इंग्रजी.
आताची स्थिती काय? पूर्वी पाचवीपासून अभ्यासक्रमात समाविष्ट असलेली भाषा आता नर्सरी पासून समाविष्ट झाली. आपल्या मधील कित्येक ती भाषा दुसरी नाही तर तिसरी म्हणून शिकले. महाराष्ट्र चा विचार केला तर मराठी, हिंदी आणि नंतर इंग्रजी असा तो प्रवास. Electronic Media मध्ये सर्रास इंग्रजी शब्दांचा वापर सुरु झालाय.
सुरुवातीला ब्रिटीशांच ग्रामर आपण अनुकरण करायला सुरु केलं. नंतर आय टी क्षेत्राचं उदय झाल्यावर अमेरिकन इंग्रजी भारतात आली. आणि त्यातून colour की color, favour की favor असे प्रश्न पडायला लागले. आपण दोन्ही शिकायला लागलो. पण आपण तिथे थांबलो नाही. जे जे आपल्याला शक्य झालं नाही त्याचा विपर्यास करणं आपण सुरु केलं. उदाहरण द्यायचं झालं तर आपले उच्चार बघा, Accent बद्दल तर बोलायला नको: ते ब्रिटीश ही नाही आणि अमेरिकन ही नाही ते आपले आहेत. म्हणजे पूर्णपणे भारतीय. म्हणजे Design त्याचं असलं तरी ते आपल्या पद्धतीने आपण Mold केलंय.
चुकीचे उच्चारले जात असलेले शब्द:
·         Development  /dɪˈvɛləpm(ə)nt/
·         Engineering   /ˌendʒɪˈnɪərɪŋ/
·         Brochure   /ˈbrəʊʃə(r)/
·         Memento    /məˈmentəʊ/
·         Pamphlet    /ˈpæmflət/
·         Were         /wɜː(r)/
·         Didn’t        /ˈdɪd(ə)nt/
·         Adobe     /əˈdəʊbi/
·         Regime  /reɪˈʒiːm/
·         Allege    /əˈledʒ/
·         Niche    /niːʃ/
·         Epitome   /ɪˈpɪtəmi/
·         Cache     /kæʃ/
इंग्रजी बोलण्याच्या बाबतीत आपलं दुसरा क्रमांक लागतो जगात. त्यामुळे आपलं वर्चस्व निर्माण झालंय. इंग्रजी ला आता आपण परकीय म्हणू शकत नाही. जर अमेरिकन इंग्रजी आणि ब्रिटीश इंग्रजी मध्ये सर्व साम्य नाही तर आपलं आणि त्याचं साम्य कसं असू शकेल?
Prepone हा शब्द बघा. एका दशकापूर्वी हा शब्द कुठल्याही Dictionary मध्ये नव्हता. त्याचा पहिल्यांदा वापर Robert Crowley यांनी १५४९ मध्ये केला. पण त्यानंतर जवळपास ती शतक तो कुठेच आढळला नाही.
Postpone  ला विरुद्ध शब्द कुठला? म्हणून आपण त्याचा वापर सुरु केला आणि पाहता पाहता तो काही Dictionaries मध्ये समाविष्ट झाला. भारतीय उपखंडात हा शब्द सर्रास वापरला जाऊ लागला. आजही गुगल करा Prepone हा शब्द सापडेल. आताचा विचार केला तर Prepone ला चुकीचं म्हणता येणं अवघड आहे. कारण आपण ते सर्वाना स्वीकारायला भाग पडलंय. आपली लोकसंख्या ही आपली ताकद.
असे अनेक शब्द आहेत. अलीकडेच एका Dictionary मध्ये ८० भारतीय शब्दांचा समावेश झाला. (Concise Oxford English Dictionary, 11th edition)
आज प्रत्येक कुटुंबात इंग्रजी शब्दांचं प्रवेश झालाय. मराठी किंवा हिंदी बोलत असताना आपण कित्येक इंग्रजी शब्दांचं वापर करतोय. इंग्रजी चं Indianism झालंय.
जसं की-
·         What is your good name? (What is your name?)
·         Very Good Morning (Good Morning)
·         I’m having a lot of work now. (I have a lot of work now)
·         Kindly revert (Please revert at the earliest.)
·         Discuss about (Discuss)
·         Take Decision (Decide)
·         Out of station (Out of town)

               
मग इंग्रजी परकीय कशी म्हणता येईल? त्यामुळे ब्रिटीश किंवा अमेरिकन यांच्या फंदात न पडता Indian English ही स्वतंत्र भाषा म्हणून स्वीकारणं गरजेचं आहे. आपण स्विकारलं तर जग ही स्विकारेल.
इंग्रजी ही एक प्रमुख भाषा आहे. ती आपल्याला आणि जगाला जोडते. आपल्याला ती त्यांच्या पद्धतीने येत नाही म्हणून कमीपणा मानण्याचे काही कारण नाही. भाषा ज्ञानाचं आदान-प्रदान करण्याचं साधन आहे. आणि त्याकडे ते माध्यम म्हणूनच पाहिलं पाहिजे. आपल्याकडे थोडी उलट परिस्थिती आहे. ज्याला ती भाषा चांगल्या पद्धतीने येते त्याला त्याचा अभिमान असतो आणि ज्यांना ती येत नाही त्यांचाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. आपलंही तसंच झालंय. इंग्रजी बोलानार्याकडे आपण वेगळ्या पद्धतीने पाहतो. म्हणजे फार हुशार, गुणवत्ता वगैरे. वास्तविक भाषेचा आणि ज्ञानाचा काही संबंध नाही.  आपली मातृभाषा आपल्याला चांगल्या पद्धतीने येतेच की.
इंग्रजी ही आताच्या काळातील बिजनेस लँग्वेज आहे.  नोकरी हवी असेल तर तुमच्या संबंधित क्षेत्रातील ज्ञानासोबत चांगले  इंग्रजी बोलता येणे गरजेचे. इंग्रजी भाषेवरून, शब्दांच्या उच्चारावरून समाजातील अथवा कॉर्पोरेट जगतातील लोकांमध्ये तुमची किंमत इंग्रजीच्या ज्ञानावरून ठरते.
शहरी भागात तर लोकं यापुढे गेले. त्यांचा कल आता इतर भाषांकडे जसे Japanese, German, French गेलाय. तसंही बहुभाषिक म्हणजे नोकरीच्या संधी जास्त. सगळ्या भाषा समान. त्यामुळे परकीय किंवा मातृभाषा या फंदात न पडता आपण बहुभाषिक व्हायला हवं.
प्रादेशिक भाषा ही टिकल्या पाहिजेत कारण ती आपली ओळख आहे. पण बहुभाषिक असण्यात काय गैर आहे?


सचिन भगत (9922127385)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव