Wednesday, October 16, 2019

अनुभव ८


गेल्या आठवड्यात अमेझॉन.इन (Amazon.in) वरून काही पुस्तके मागवली होती. चार-पाच दिवसात पुस्तके मिळालीही. मागवलेली सर्व पुस्तके मिळाली असं मला वाटलं. दोन-तीन दिवसांनी  सहज चं अमेझॉन.इन च्या ऑर्डर सेक्शन मध्ये गेलो  तर लक्षात आलं की जेवढी पुस्तके मागवली त्यापैकी एक पुस्तक मिसिंग आहे. ज्या बॉक्स मध्ये पुस्तके आली त्यात एक पुस्तक कमी होतं. इकडे ते डिलिव्हरी (Delivery) झाली असं दाखवतेय. काहीतरी घोळ झाला.
कस्टमर केअर ला संपर्क साधला. अमेझॉन.इन च्या साईटवर Customer Help ला क्लिक केलं. तिथे दोन  पर्याय आहेत. Chat Right Now किंवा Have us call you. मी  Chat Right Now  हा पर्याय निवडला.  दुसरी विंडो ओपन झाली आणि माझा प्रोब्लेम मी सांगितला.  झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करून आमचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल असं सांगण्यात आलं.
काही क्षणात त्यांच्या प्रतिनिधीने माझ्याशी फोन करून संपर्क साधला. पुन्हा एकदा माहिती जाणून घेतली. त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता येत्या दोन-तीन दिवसात (Business Days) रिफंड (Refund) करतो असं सांगितलं आणि त्यांनी दुसर्या दिवशी ती रक्कम रिफंड केली. सारं काही तत्काळ.
नेमका घोळ कसा झाला? सेलर तर असे करत नसतील? माझ्या लक्षात आलं नसतं तर फसवल्या गेलो असतो.
अमेझॉन ने  फार काही खोलात न जाता रक्कम केली. मला खरंच ते मिळालं नाही याची शहानिशा केली नाही. मी सांगतोय ते खरं समजून तो सोडवण्याचा प्रयत्न केला ताबडतोब.
ग्राहक...”कस्टमर इज द किंग म्हटलं जातं” ते यासाठीच (Customer is the king).
दोष कुठे असेल ते शोधतील ही कदाचित ...पण आता आपल्याला जोडलेला ग्राहक दूर जायला नको. त्याचा विश्वास कायम राहायला हवा आणि त्यामुळे ग्राहकाच्या समस्यांचं समाधान करणे याला सगळ्यात जास्त महत्व. ज्याला हे समजलं तो व्यवसायात पुढे जातो. मग कितीही स्पर्धा असो.
ऑनलाईन खरेदी करताना अनेक अनुभव येतात. कित्येकदा फसवणूक ही होते.
माझ्या  परिचयातल्या एका व्यक्तीला ला एकदा फोन आला की तुम्हाला अमुक –तमुक कंपनीचा मोबाईल केवळ ३९९९/- मध्ये मिळतोय ज्याची बाजारात किंमत अकरा हजाराच्या जवळपास आहे.  त्या व्यक्तीने होकार दिला. चार-पाच दिवसांनी पार्सल आलं. पे ओन डिलिव्हरी. पैसे दिले. उघडून पाहिलं तर त्यात बेल्ट आणि एक चष्मा निघाला. ज्या नंबर वरून फोन आला त्यावर फोन करायला गेले तर नंबर अस्तित्वात नाही. कुठे जाणार? सोडून द्यावं लागलं. आपल्यापैकी अनेकांना असा गंडा घातला गेलाय.
ऑनलाईन खरेदी करण्यार्यांचे प्रमाण प्रचंड वाढलंय. शहरी भागापासून ते ग्रामीण पर्यंत. आज-काल प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहेच. त्यामुळे Browsing सोपं झालंय. जसे व्यापार करणारे सरसावले तसेच फसवणूक करणारे ही.
ऑनलाईन (Online Shopping) खरेदी करताना वस्तू जशी दिसते तशी असतेच असंही नाही. दुकानात जाऊन वस्तू खरेदी करताना आपण ती वस्तू प्रत्यक्ष हातात घेऊन त्या वस्तूच्या गुणवत्ते बाबत (Quality) तपासणी करत असतो.  ऑनलाईन खरेदी करताना हा पर्याय नसतोच. एखादी वस्तू ऑनलाइन जरी आकर्षक वाटत असली, तरी प्रत्यक्षात ती तशी असेलच असे नाही. कित्येकदा damaged products मिळतात. किमती नेहमी बदलत असतात. खरी किमत कुठली हे आपल्यालाही समजत नाही. एवढी ऑफर (Offer) तेवढी ऑफर. हा सेल तो सेल वर्षभर सुरूच असतो की. त्यामुळे वस्तू विकत घेताना चांगल्या आणि नावाजलेल्या वेबसाइट्सवरूनच घ्यायला हव्या. अनेक ई कॉमर्स पोर्टल्स (E Commerce)आहेत.

कित्येक फेक वेबसाईटस आहेत. आपल्याकडे फारशी जागरुकता नाहीच. त्यामुळे सहज फसवणूक लवकर होते. कधी कधी आपल्यापैकी कित्येक जण whats app वर लिंक पाठवतात. त्या मुळात फेक असतात. असो.

सचिन भगत
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव


Friday, October 11, 2019

लहानपण देगा देवा


कानावर पडलेला एक संवाद:-  स्थळ: रेल्वे स्टेशन
वडील: हे  बघ, ट्रेन जातेय.
लहान मुलगा: ट्रेन...मग ती कुठे जाते?
वडील: सगळीकडे....
लहान मुलगा: सगळीकडे कुठं?
वडील: मुंबई, नागपूर, दिल्ली अशी सगळीकडे.
लहान मुलगा: मग या दुसर्या ट्रेन ला काय झालं?
वडील: ती थांबलीय....गुड्स ट्रेन आहे ती.
लहान मुलगा: मग तिला काय झालं?
वडील: काहीच नाही.
लहान मुलगा: मग त्यात कोण जाते?
वडील: आपण नसतो जात त्यात. सामान ने ने-आण करतात.
लहान मुलगा: कोणते सामान...
वडील: सगळं...आपल्याला जे जे लागते ते गुड्स ट्रेन ने येते. तुला सायकल घेतली ना,,,ती पण गुड्स ट्रेन मध्ये आली होती.
लहान मुलगा: मग आपण पण  जाऊ ट्रेन गुड्स ट्रेन मध्ये...
वडील: आपण नसतो जात त्यात . आपण पसेंजर ट्रेन मध्ये जातो.
लहान मुलगा: मग पसेंजर ट्रेन मध्ये कोण असते?
वडील: लोकं असतात. ते प्रवास करतात.
लहान मुलगा:  आपली ट्रेन आहे ही?
वडील: नाही.
लहान मुलगा: मग कुणाची आहे?
वडील: ती गव्हर्नमेंट ची असते.
लहान मुलगा: मग गव्हर्नमेंट कुठे राहते?
वडील: अरे बाबू, गव्हर्नमेंट एक संस्था असते.
लहान मुलगा:  मग गव्हर्नमेंट बोलते का आपल्याशी?
वडील: नाही.
लहान मुलगा:  मग आपल्याशी का बोलत नाही?
वडील: ती बोलत नाही.
लहान मुलगा: मग आपण रोड वर आणू ट्रेन ला.
वडील:ती रोड वर नाही येत.
लहान मुलगा: मग ती कशी चालते.
वडील: ती track वर चालते. चल आता आपण घरी जाऊ.
...................................................................................................................................................................................

 ...................................................................................................................................................................................


सचिन भगत  (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव

Thursday, October 10, 2019

व्लोगिंग (Vlogging) म्हणजे काय?


व्लोग (Vlog)...अलीकडे प्रचलित झालेला शब्द. आपल्यापैकी कित्येकांना माहित नाही.
व्लोग ची व्याख्या अशी:
“a video blog: a record of your thoughts, opinions, or experiences that you film and publish on the internet.” (https://dictionary.cambridge.org/dictionary/english/vlog)

थोडक्यात व्हिडीओ ब्लॉग (Video Blog). वेब टेलेव्हिजन (Web Television) चा एक प्रकार. व्हिडीओ च्या माध्यमातून जाहिरात करणे, माहिती पोचवणे, जागरुकता निर्माण करणे, मनोरंजन करणे ई. पूर्वी ब्लॉगिंग ला सपोर्ट म्हणून व्हिडीओ जोडले जायचे. आता मात्र व्लोगिंग एक स्वतंत्र क्षेत्र निर्माण झालंय.
साधारणतः २००५ नंतर व्लोगिंग मध्ये प्रचंड वाढ झाली. यु ट्यूब हे व्लोगिंग लोकप्रिय माध्यम. एक प्रकारची मोनोपोली आहे यु ट्यूब ची.
पूर्वी सोशल नेट्वर्किंग ला फक्त लिखित माहिती, फोटो, कधी कधी व्हिडीओ असायचे.  फेसबुक वर नाही का आजकाल व्हिडीओ अपलोड करणे सुरुय. दृक-श्राव्य आपल्याला जास्त भावते. कारण लिखाणातून व्हिजुअल्स, भाव दाखवता येत नाही. त्यामुळे वाचक ते गंभीरतेने कदाचित घेणार नाही. त्यामुळे व्हिडीओ अपलोड करण्यावर भर दिसतोय. न्यूज चनेल चं उदाहरण घ्या. त्यांनी किती व्हिडीओ अपलोड केलेले असतात.  सोशल नेट्वर्किंग (फेसबुक, ट्विटर, इंस्ताग्राम, whatsapp) वर आजकाल व्हिडीओ जास्त फोरवर्ड केले जात आहे.
स्मार्ट फोन सामन्यांच्या हाती पडला; त्यात जिओ ने इंटरनेट डेटा सहज उपलब्ध करून दिला आणि यु ट्यूब वापरणार्यांची संख्या प्रचंड वाढली.

आजकाल प्रत्येक जण आपला वेळ मोबाईल वापरण्यात घालवतो.  शहरी-भागापुरत ते मर्यादित न राहता ग्रामीण भागात ही विस्तारलं आहे. हिच संधी व्लोगर्स नी टिपली.
कित्येक व्लोगर सक्रीय आहेत यु ट्यूब वर. एखादा नवीन स्मार्ट फोन बाजारात आला की त्याचे reviews सहज उपलब्ध होतात. म्हणजे काय कुठलाही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस बद्दल माहिती  व्हिडीओ च्या माध्यमातून.  ग्राहकांना येणाऱ्या समस्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करतात व्लोगर्स. तुम्ही काही पण टाईप करा. असंख्य व्हिडीओ दिसतात.
फायदे:
•भेट देणार्याची संख्या वाढते
•अपिलिंग
•जाहिरातीसाठी उत्तम माध्यम , product  किंवा service चांगल्या प्रकारे दाखवता येते
•खिळवून ठेवते 
•आत्मविश्वास वाढतो
•बोलताना वाटणारी भीती नाहीशी होते.

व्लोगिंग मध्ये वेगळं पण चांगलं करिअर घडवता येऊ शकते. फक्त content दमदार पाहिजे. तसंही आपण म्हणतोच की Content is the king. हे एका रात्रीत होत नाही.  वेळ लागतो. मेहनत लागते.
यु ट्यूब वर स्वतःच चनेल सुरु करून आपण अमर्यादित व्हिडीओ अपलोड करू शकतो. ते ही कुठलीही फी न भरता. मोफत आहे. यु ट्यूब Video Hosting निशुल्क पुरवते.
छोटे-छोटे व्हिडीओ तयार करून नियमित पणे अपलोड करायला सुरुवात करायला हरकत नाही. आपल्याकडे काय हवं तर एक व्हिडीओ कॅमेरा, इन्टरनेट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कल्पना. बघणाऱ्यांची संख्या जशी जशी वाढत जाईल तसं तसं कमावण्याचा एक मार्ग उपलब्ध होऊ शकतो.
काळ झपाट्याने बदलतोय. प्रत्येक क्षेत्रात आमुलाग्र बदल होत आहेत. काळानुसार चालायचं तर नव-नवीन गोष्टी शिकायला हव्यात.

सचिन भगत  (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव