एलीस गार्डन
पुणे विद्यापीठाचा परिसर खूप विस्तीर्ण आहे. पुणे विद्यापीठाचा परिसर हा शैक्षणिक
ओळख, इतिहास यांबरोबरच ओळखले जातो तो या
आवारातील वृक्षसंपदेसाठी आणि तेथील जैव विविधतेसाठी. देशी आणि परदेशी वृक्ष हि या
परिसरात आढळतात. जवळपास ४११ एकर चा
हा परिसर. विद्यापीठात गेल्यावर विद्यापिठाच खरं सौंदर्य कळत. मुख्य
प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा आपले लक्ष्य
वेधून घेतो. छत्रपती
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती एक लंब वर्तुळाकार जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात
आला आहे. विद्यापीठात
गेल्यानंतर कित्येक संध्याकाळी मी त्या पुतळ्याजवळ एकटा बसून असायचो. एविनिंग वाक
ला जॉगिंग ट्रॅक वर
खूप लोकं असतात त्या वेळी. या पलीकडे तिथे कपल्स
हि मोठ्या प्रमाणावर फिरताना दिसतात. काही दिवसानंतर हि काही आपली बसण्याची जागा
होऊ शकत नाही असं समजलं आणि थेट जयकर चा रस्ता पकडू लागलो. संध्याकाळ च्या वेळेस
एकही कपल जयकर मध्ये दिसत नाही. दिवसभर अभ्यास करून थकतात बिचारे आणि संध्याकाळी
फिरायला जातात. विद्यापीठात भरपूर कपल पौइंट आहेत जसं कि मेन बिल्डींग चा मागील
भाग, ओपन कॅण्टीन, एलीस गार्डन आणि असे कित्येक.
एलीस गार्डन बद्दल फार काही माहित नव्हतं
सुरुवातीला. ब्रिटिश
काळात विकसित झालेल्या गार्डन पैकी हे एक. विद्यापीठात गेल्यानंतर ब्रिटीशकालीन
इमारतीच्या रचना आपल्या दृष्टीक्षेपात येतात. ओल्ड कॅण्टीन च्या समोर एक गेट तर सेवक चाळ आणि लेडीज
होस्टेल च्या बाजूने दुसरं गेट. त्याला
एलीस हे नाव कसं पडलं याची नक्की माहिती नाही परंतु एलीस नावाची एक परदेशी महिला रहस्यमयरीत्या
संदिग्ध अवस्थेत मृत आढळली होती आणि तिच्या नावावरून एलीस हे नाव असावं कदाचित.
कधी कधी मी आणि माझा मित्र तिकडे फेरफटका मारत
असू. गार्डन मध्ये खूप जुनी आणि वेगवेगळ्या जातीची अशी विस्तीर्ण झाडे आहेत. सगळीकडे
हिरवळ. अतिशय शांत आणि गार वातावरण. नैसर्गिक सौंदर्याने बहरलेलं ते गार्डन. तिथे फिरत
असताना तो पाना-फुलांचा नैसर्गिक सुगंध अनुभवयास येतो. दिवसभर कित्येक जन तिथे
बसलेले असतात. कुणाकडे पुस्तके , कुणाचं वाचन सुरु आणि बरंच काही. तर काही
निद्रिस्त. मध्यभागी तालावासारखं आहे. तिथे पाणी साठलेलं असते. ठिकठिकाणी
बसण्यासाठी बेंचेस आहेत. बहुधा सगळे लोन वरच बसतात.
गार्डन मध्ये एक गोल जॉगिंग ट्रॅक आहे. त्याला चक्कर मारलं म्हणजे पूर्ण एलीस
गार्डन पाहण्याचा आनंद घेता येतो. झाडा-झुडुपांच्या आड ठिकठिकाणी कपल्स बसलेले
दिसतात. ते विद्यापीठातील असतात असं काही नाही...बाहेरचे कित्येक येतात. बर्याच
वेळा मी आणि माझा एक मित्र फिरत असताना आम्हाला आमच्या ओळखीचे कपल्स दिसायचे. ते
कधी आपल्याकडे पाहत नाही. चुकून नजर एक झालीच तर चेहऱ्यावर हास्य खुलून दिसायचं.कित्येकांचं
प्रेम इथेच बहरलं आहे. काही कायमचे बंधनात अडकले तर काहींची ताटातूट झाली किंवा
त्यांनी केली. संध्याकाळी ६ नंतर मात्र तिथे जाण्यास परवानगी नसते. एखाद्या वेळी
गाडीवरून बाहेरच्या रोडने जात असताना उठ रे, कोण आहे रे तिथं असं ओरडण्याचा
बालिशपणा हि आम्ही बर्याचदा केलाय. शेवटी
आपण माणसचं ना. कितीही पुढारलो तरी येणार तिथंच.
नन्तर मात्र आम्ही तिकडे जाने बंद केलं. गेलोच तर
तिथं फिरण्या ऐवजी लोन वर बसायचं. कित्येक विद्यार्थी तिथे अभ्यासाला जातात. पण
किती अभ्यास होत असेल याबाबत शंकाच आहे. कारण आपलं लक्ष विचलित करण्याचा भरपूर
गोष्टी तिथे असतात. नैसर्गिक सौंदर्याबरोबरच विविध गोष्टींसाठी ओळखले जाणारे हे
गार्डन. पुणे हे फक्त विद्येच माहेरघर आहे असं नाही तर इतर अनेक गोष्टीचं आहे असं
म्हणायला हरकत नाही. विद्यापीठात आलेला विद्यार्थी फक्त अभ्यास करतो असं नाही तर
तो अनेक बाबतीत पुढे असतो. ज्याला जो मार्ग आवडतो तो त्या मार्गाने पुढे जातो.
ज्ञानार्जनापलीकडचं जग हि आपल्याला खुणावत असतंच कि.
शेवटी “पुणे तिथे उणे काय” हे काय खोटं आहे व्हय.
सचिन भगत
No comments:
Post a Comment