इंग्रजी: भारतीय
की परकीय?
इंग्रजी: भारतीय की
परकीय? याचं उत्तर तसं परकीय. कारण हेच आपण शिकत आलोय. ब्रिटिशांनी ती भाषा भारतात
आणली, रुजवली आणि ते गेल्यानंतर तीचा वापर वाढत गेला. ज्याला इंग्रजी येते त्याचा
बोलबाला असं काहीसं चित्र या देशात निर्माण झालं. प्रत्येकाला ती भाषा शिकाविशी
वाटली. इंग्रजी येत नाही म्हणून कमी पणाची भावना कित्येकांच्या मनात. पूर्वी पण
तसं चित्र होतं आणि आजही आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि त्यांचा सुळसुळाट हे
त्यातूनच आलं. गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत, गल्ली पासून दिल्ली पर्यंत ती भाषा हवी-हवीशी वाटली. कुठल्याही शहरात जा
इंग्रजी भाषा शिकवनारे क्लासेस दिसून येतील. Inferiority
Complex प्रत्येकाला.
कित्येकदा तो भंडावून सोडतो. इंग्रजी येते म्हणजे भलतंच काही असा समज निर्माण
झाला. आजकाल तर पालक आपल्या मुलांना देखील मातृभाषा सोडून इंग्रजी प्रथम
शिकवण्याचा प्रयत्न करतात. सध्याची परिस्थिती अशी आहे की इंग्रजी माध्यमात
शिकणाऱ्या कित्येक विद्यार्थ्यांना आपली मातृभाषा व्यवस्थित लिहिता-वाचता येत नाही.
बर्याच अशी अवस्था होते की आपल्याला ना धड मातृभाषा येते ना इंग्रजी.
आताची स्थिती काय? पूर्वी
पाचवीपासून अभ्यासक्रमात समाविष्ट असलेली भाषा आता नर्सरी पासून समाविष्ट झाली. आपल्या
मधील कित्येक ती भाषा दुसरी नाही तर तिसरी म्हणून शिकले. महाराष्ट्र चा विचार केला
तर मराठी, हिंदी आणि नंतर इंग्रजी असा तो प्रवास. Electronic Media मध्ये सर्रास इंग्रजी शब्दांचा वापर सुरु
झालाय.
सुरुवातीला ब्रिटीशांच ग्रामर
आपण अनुकरण करायला सुरु केलं. नंतर आय टी क्षेत्राचं उदय झाल्यावर अमेरिकन इंग्रजी
भारतात आली. आणि त्यातून colour की color, favour की favor असे प्रश्न पडायला
लागले. आपण दोन्ही शिकायला लागलो. पण आपण तिथे थांबलो नाही. जे जे आपल्याला शक्य
झालं नाही त्याचा विपर्यास करणं आपण सुरु केलं. उदाहरण द्यायचं झालं तर आपले
उच्चार बघा, Accent बद्दल तर बोलायला
नको: ते ब्रिटीश ही नाही आणि अमेरिकन ही नाही ते आपले आहेत. म्हणजे पूर्णपणे
भारतीय. म्हणजे Design त्याचं असलं तरी ते आपल्या पद्धतीने आपण Mold केलंय.
चुकीचे उच्चारले जात
असलेले शब्द:
·
Development /dɪˈvɛləpm(ə)nt/
·
Engineering /ˌendʒɪˈnɪərɪŋ/
·
Brochure /ˈbrəʊʃə(r)/
·
Memento /məˈmentəʊ/
·
Pamphlet /ˈpæmflət/
·
Were /wɜː(r)/
·
Didn’t /ˈdɪd(ə)nt/
·
Adobe /əˈdəʊbi/
·
Regime /reɪˈʒiːm/
·
Allege /əˈledʒ/
·
Niche /niːʃ/
·
Epitome /ɪˈpɪtəmi/
·
Cache /kæʃ/
इंग्रजी बोलण्याच्या
बाबतीत आपलं दुसरा क्रमांक लागतो जगात. त्यामुळे आपलं वर्चस्व निर्माण झालंय. इंग्रजी
ला आता आपण परकीय म्हणू शकत नाही. जर अमेरिकन इंग्रजी आणि ब्रिटीश इंग्रजी मध्ये
सर्व साम्य नाही तर आपलं आणि त्याचं साम्य कसं असू शकेल?
Prepone हा शब्द बघा.
एका दशकापूर्वी हा शब्द कुठल्याही Dictionary
मध्ये नव्हता. त्याचा
पहिल्यांदा वापर Robert Crowley यांनी १५४९
मध्ये केला. पण त्यानंतर जवळपास ती शतक तो कुठेच आढळला नाही.
Postpone
ला विरुद्ध शब्द कुठला? म्हणून आपण त्याचा वापर
सुरु केला आणि पाहता पाहता तो काही Dictionaries
मध्ये समाविष्ट
झाला. भारतीय उपखंडात हा शब्द सर्रास वापरला जाऊ लागला. आजही गुगल करा Prepone हा शब्द सापडेल. आताचा
विचार केला तर Prepone ला चुकीचं
म्हणता येणं अवघड आहे. कारण आपण ते सर्वाना स्वीकारायला भाग पडलंय. आपली लोकसंख्या
ही आपली ताकद.
असे अनेक शब्द आहेत.
अलीकडेच एका Dictionary मध्ये ८० भारतीय
शब्दांचा समावेश झाला. (Concise Oxford English
Dictionary, 11th edition)
आज प्रत्येक कुटुंबात
इंग्रजी शब्दांचं प्रवेश झालाय. मराठी किंवा हिंदी बोलत असताना आपण कित्येक
इंग्रजी शब्दांचं वापर करतोय. इंग्रजी चं Indianism झालंय.
जसं की-
·
What is your good name?
(What is your name?)
·
Very Good Morning (Good
Morning)
·
I’m having a lot of
work now. (I have a lot of work now)
·
Kindly revert (Please
revert at the earliest.)
·
Discuss about (Discuss)
·
Take Decision (Decide)
·
Out of station (Out of
town)
मग इंग्रजी परकीय कशी
म्हणता येईल? त्यामुळे ब्रिटीश किंवा अमेरिकन यांच्या फंदात न पडता Indian English ही स्वतंत्र भाषा म्हणून
स्वीकारणं गरजेचं आहे. आपण स्विकारलं तर जग ही स्विकारेल.
इंग्रजी ही एक प्रमुख
भाषा आहे. ती आपल्याला आणि
जगाला जोडते. आपल्याला ती त्यांच्या पद्धतीने येत नाही म्हणून कमीपणा मानण्याचे
काही कारण नाही. भाषा ज्ञानाचं आदान-प्रदान करण्याचं साधन आहे. आणि त्याकडे ते
माध्यम म्हणूनच पाहिलं पाहिजे. आपल्याकडे थोडी उलट परिस्थिती आहे. ज्याला ती भाषा
चांगल्या पद्धतीने येते त्याला त्याचा अभिमान असतो आणि ज्यांना ती येत नाही
त्यांचाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. आपलंही तसंच झालंय. इंग्रजी
बोलानार्याकडे आपण वेगळ्या पद्धतीने पाहतो. म्हणजे फार हुशार, गुणवत्ता वगैरे.
वास्तविक भाषेचा आणि ज्ञानाचा काही संबंध नाही. आपली मातृभाषा आपल्याला चांगल्या पद्धतीने येतेच
की.
इंग्रजी ही आताच्या
काळातील बिजनेस लँग्वेज आहे. नोकरी हवी असेल तर
तुमच्या संबंधित क्षेत्रातील ज्ञानासोबत चांगले इंग्रजी बोलता येणे गरजेचे. इंग्रजी भाषेवरून, शब्दांच्या उच्चारावरून समाजातील
अथवा कॉर्पोरेट जगतातील लोकांमध्ये तुमची किंमत इंग्रजीच्या ज्ञानावरून ठरते.
शहरी भागात तर लोकं
यापुढे गेले. त्यांचा कल आता इतर भाषांकडे जसे Japanese, German, French गेलाय. तसंही बहुभाषिक
म्हणजे नोकरीच्या संधी जास्त. सगळ्या भाषा समान. त्यामुळे परकीय किंवा मातृभाषा या
फंदात न पडता आपण बहुभाषिक व्हायला हवं.
प्रादेशिक भाषा ही टिकल्या पाहिजेत कारण ती आपली ओळख आहे.
पण बहुभाषिक असण्यात काय गैर आहे?
सचिन भगत (9922127385)
श्री संत गजानन
महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव