मनात खूप काही असतं. ते सांगायला नेहमी कुणीतरी मिळेलच असं नाही. कुणी समजून घेईल याची पण शाश्वती नाही. नाहीतरी कुणाच्या भावना कुणी समजू शकत नाही. त्यासाठी त्या स्वतः अनुभव्या लागतात. म्हणून शब्दात मांडण्याचा हा केविलवाणा प्रयत्न. काही काल्पनिक तर काही सत्य असा तो संगम. मी काही लेखक नाही. जे लिहितो ते माझ्यासाठी, माझ्या समाधानासाठी. "काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात, काही न समजून समजल्यासारखे करायचे असते अन काही समजून न समजल्यासारखे..."